आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:प्रसिद्ध अभिनेते रणजित चौधरींचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन, 'खट्टा मीठा' आणि 'खुबसूरत' चित्रपटांसाठी ओळखले जातात  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेते रणजित यांनी रेखा-राकेश रोशन यांच्यासोबत केले होते काम
  • 15 एप्रिल रोजी झाले निधन

मुंबई ‘खट्टा मिठ्ठा’, ‘बातो बातो में’, ‘मिसिसिपी मसाला’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारणारे अभिनेते रणजित चौधरी यांचे निधन झाले. ते 64 वर्षांचे होते.  ‘खुबसूरत’, ‘चक्र’, ‘कालिया’, ‘कांटे’, ‘बॅन्डिक्ट क्वीन’, ‘फायर’, ‘कामसूत्र- अ टेल ऑफ लव्ह’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अभिनेत्यासोबतच ते लेखक आणि दिग्दर्शकही होते. ते अभिनेते पर्ल पद्मसी यांचे पुत्र आणि रैल पद्मसी यांचे भाऊ होते. रैल पद्मसी या प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक आहेत. 

रणजित यांच्या निधनाचे वृत्त त्यांची बहीण रैल पद्मसी यांनी एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, 15 एप्रिल रोजी रणजित यांनी या जगाचा निरोप घेतला. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. लॉकडाऊन संपल्यानंतर 5 मे रोजी त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले जाणार आहे. रणजित चौधरी यांचे निधन कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'खूबसुरत' या चित्रपटात रणजित यांनी रेखा आणि राकेश रोशन यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटात त्यांनी साकारलेली जगन ही व्यक्तिरेखा गाजली होती. 

बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर रणजित 1980 मध्ये अमेरिकेत स्थायिक झाले होते. तिथेही त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘लास्ट हॉलिडे’, ‘लोनली इन अमेरिका’, ‘केटल ऑफ फिश’, ‘होप अँड अ लिटिल शुगर’, ‘ब्रेकवे’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. दीपा मेहता दिग्दर्शित ‘साम अॅण्ड मी’ या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती. त्यांचा ‘द ऑफिस’ हा टीव्ही शो लोकप्रिय झाला. त्यांनी स्टीव कॅरेल आणि जैना फिशर या कलाकारांसोबत काम केले. 

रणजित चौधरी अखेरचे ‘कांटे’या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘कांटे चित्रपटात तुझ्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. ‘खट्टा मिठा’ हा माझा आवडता चित्रपट आहे. तुझ्या अभिनयातून प्रेक्षकांचे फार मनोरंजन झाले. तुझ्या आत्म्यास शांती मिळो’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...