आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा अभिनेत्रींच्या गोड बातमीने बसला धक्का:लग्नाला दोन महिने पूर्ण होण्याआधीच नेहा कक्कर प्रेग्नंट, या 5 अभिनेत्रीही लग्नाआधीच होत्या प्रेग्नेंट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेहाच्या लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्करच्या लग्नाला 24 डिसेंबर रोजी दोन महिने पूर्ण होणार आहेत. त्यापूर्वीच तिने प्रेग्नेंसीची घोषणा करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नेहाने सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे. 24 ऑक्टोबर रोजी नेहा आणि रोहन दिल्लीत विवाहबंधनात अडकले होते. नेहाच्या प्रेग्नेंसीच्या बातमीने ती लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलिवूडमध्ये लग्नापूर्वी प्रेग्नेंट राहिलेल्या अभिनेत्रींची मोठी यादी आहे. एक नजर टाकुया कोणकोण आहेत या अभिनेत्री...

नेहा धुपिया

मे 2018 मध्ये नेहाने घाईघाईत अंगद बेदीशी लग्न केले होते. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांनी नेहाने ती गर्भवती असल्याचे सांगून सर्वांना चकित केले होते. नेहा लग्नाच्या सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर 2018 मध्ये मुलगी मेहरला जन्म दिला.

श्रीदेवी

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसुद्धा लग्नाआधीच प्रेग्नेंट होती. लग्नापूर्वीच तिने प्रेग्नेंट असल्याचे मीडियासमोर कबूल केले होते. सात महिन्यांची गरोदर असताना 1996 मध्ये निर्माते बोनी कपूरबरोबर तिने लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यातच श्रीदेवीने जान्हवीला जन्म दिला होता. बोनी यांनी श्रीदेवीसोबत दुसरे लग्न केले होते.

कोंकणा सेन शर्मा

कोंकणाने 2007 मध्ये रणवीर शौरीला डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी सप्टेंबर 2010 मध्ये लग्न केले. लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांंनी कोंकणाने मुलगा हारूनला जन्म दिला होता.

नीना गुप्ता

नीना गुप्ता वेस्ट इंडीजचे क्रिकेटर विव्हियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये असताना गर्भवती राहिल्या होत्या. नीना यांनी विव्हियन यांच्याशी लग्न केले नाही. मात्र तरीदेखील त्यांनी मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी लग्न न करताच मुलगी मसाबाला जन्म दिला आणि एकटीने तिचा सांभाळ केला.

सारिका

कमल हसन आणि सारिका लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्याच काळात सारिका गर्भवती असल्याची बातमी समोर आली होती. 28 जानेवारी 1986 रोजी श्रुती हसनचा जन्म झाला. सारिका आणि कमल यांनी 1988 मध्ये लग्न केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser