आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कला विश्वाचे मोठे नुकसान:‘चलो बुलावा आया है’ गाणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे  निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 16 ऑक्टोबर 1940 रोजी अमृतसर येथे जन्मलेले नरेंद्र चंचल बालपणीपासूनच मातारानीचे भजन गायचे.
  • दीर्घ काळापासून ते आजारी होते. तीन दिवसांपासून दिल्लीतील अपोलो रुग्णालयात ते दाखल होते.

प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांनी प्रसिद्ध भजनांसह हिंदी चित्रपटांतही पार्श्वगायन केले होते. त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतानेच नव्हे तर लोक संगीताद्वारेही लोकांची मनं जिंकली. ‘बॉबी’ या चित्रपटातील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ या आणि ‘आशा’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे ते घराघरांत पोहोचले होते. ते दीर्घ काळापासून आजारी होते आणि मागील तीन दिवसांपासून दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल होते. आज दुपारी 12.15 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

16 ऑक्टोबर 1940 रोजी अमृतसर येथे चेतराम खरबंदा आणि कैलाश वती यांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. त्यांना लहानपणापासून भजन गाण्याची आवड होती. मातारानीची भजन ते लहानपणापासून गात असायचे. त्यांची आई त्यांची पहिली गुरु होती. त्यानंतर त्यांनी प्रेम त्रिखा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले होते.

‘चलो बुलावा’मुळे रातोरात लोकप्रिय
बॉलिवूडमधील त्यांचा प्रवास राज कपूर यांच्यासोबत सुरु झाला होता. ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ हे गाणे त्यांनी गायले होते. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते. आशा या चित्रपटातील 'चलो बुलावा आया है माताने बुलाया है…' या भजनामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भजनामुळे ते घराघरात पोहोचले.

मार्च 2020मध्ये नरेंद्र चंचल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते दुर्गामातेचं भजन गाताना दिसले होते. या व्हिडिओत ते कोरोनावरील गाणे गाताना दिसले होते. ‘डेंगू भी आया और स्वाईन फ्लू भी आया, चिकन गोनिया ने शोर मचाया, कित्थे आया कोरोना?…’ हे गाणे गाताना ते व्हिडिओत दिसले होते. 1944 पासून ते दरवर्षी वैष्णो देवीच्या दरबारात आयोजित होणा-या वार्षिक जागरणाला हजेरी लावत असे. मागील वर्षी कोरोनामुळे ते सहभागी होऊ शकले नव्हते.