आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरोज खान रुग्णालयात:प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचा श्वसनाचा त्रास वाढल्याने केले रुग्णालयात दाखल, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक किंवा दोन दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई | प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. हे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना एक किंवा दोन दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. 

चार दशकांपेक्षा जास्त काळापासून सरोज खान कोरियोग्राफी करत आहेत. त्यांनी 2 हजारांपेक्षा जास्त गाणे कोरियोग्राफ केले आहेत. 22 नोव्हेंबर 1948 मध्ये त्यांचा जन्म झाला. सरोज खान हे असे नाव आहे जे बॉलीवूडमध्ये सर्वांना परिचित आहे. त्यांच्या नृत्य कौशल्याची सगळीकडेच चर्चा असते. 

सरोज खान यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक प्रसिद्ध गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. त्यांनी देवदासचा डोला रे डोला, माधुरी दीक्षित स्टारर तेजाब चित्रपटावरील एक दो तीन आणि जब वी मेट चित्रपटातील इश्क हाय सारख्या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. कोरिओग्राफर म्हणून सरोज खानचा नुकताच कलंक चित्रपटातील गाण्यांचे दिग्दर्शन केले. तसेच त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...