आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरंजन सृष्टीला आणखी एक मोठा धक्का:'लय भारी', 'दृष्यम'चे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन, हैदराबादमध्ये घेतला अखेरचा श्वास; अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करुन वाहिली श्रद्धांजली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 31 जुलैपासून हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
  • 50 वर्षीय निशिकांत यांना पोटदुखीच्या त्रासाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • सोमवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली होती. पण त्यावेळी ते व्हेंटिलेटवर होते. दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

मनोरंजन विश्वाला आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 'लय भारी', 'मदारी', 'रॉकी हँडसम', 'दृष्यम' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक निशिकांत काम यांचे निधन झाले आहे. दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करुन निशिकांत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • सकाळीच आली होती निधनाची बातमी

सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी बातमी आली होती. दिग्दर्शक मिलाप झावेरी यांनी ट्विट करुन कामत यांचे निधन झाल्याचे सांगितले होते. पण त्यावेळी हे वृत्त चुकीचे होते. पहिल्या ट्विटनंतर 12 मिनिटांनी मिलाप यांनी आणखी एक ट्विट करुन, निशिकांत हे आपल्यातच असल्याचे सांगितले होते. तर अभिनेता रितेश देशमुख यानेही एक ट्विट करुन, निशिकांत कामत हे व्हेंटिलेटवर असून त्यांचा जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरु आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे म्हटले होते. मात्र आता दुपारी निशिकांत कामत काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

अभिनेता अजय देवगणचे ट्वीट

  • 17 दिवसांपासून होते रुग्णालयात

50 वर्षीय कामत यांना काविळ आणि पोटदुखीच्या त्रासामुळे 31 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

निशिकांत मागील दोन वर्षांपासून यकृतासंबंधित आजाराने त्रस्त होते. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर होती. पण गेल्या आठवड्यात अचानक त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • 2005 मध्ये दिग्दर्शनात केले होते पदार्पण

निशिकांत कामत यांनी 2005 साली 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. हा चित्रपट त्यावर्षीच्या हिट मराठी चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

  • 'दृष्यम'द्वारे मिळाली प्रसिद्धी

मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या निशिकांत यांनी कमी वेळातच हिंदी सिनेसृष्टीत आपला जम बसवला होता. 'दृश्यम', 'मुंबई मेरी जान', 'मदारी', 'फोर्स' हे त्यांचे चित्रपट हिट ठरले. 2015 मध्ये आलेल्या दृष्यम या चित्रपटाद्वारे त्यांना लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू आणि श्रेया सरन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. मराठीतही त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 'डोंबिवली फास्ट'सह रितेश देशमुख स्टारर 'लय भारी', स्वप्निल जोशी-सुबोध भावे स्टारर 'फुगे' हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले आहेत.

  • अनेक चित्रपटांमध्ये केला अभिनय

दिग्दर्शनाबरोबरच निशिकांत यांनी अभिनयातही आपणी चुणूक दाखवली. 'सातच्या आत घरात' (मराठी), 'रॉकी हॅण्डसम', '404 एरर नॉट फाऊंड', 'जुली-2', 'भावेश जोशी' या चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. यापैकी 2016 मध्ये आलेल्या रॉकी हँडसम या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. ते अखेरचे हर्षवर्धन कपूर स्टारर भावेश जोशी या चित्रपटात झळकले होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...