आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:संजय लीला भन्साळींनी दोन नव्हे तर चार चित्रपटांची दिली होती सुशांत सिंह राजपूतला ऑफर, ही आहे 'या'मागची कहाणी 

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चारही चित्रपटांबद्दल संजय लीला भन्साळींनी पोलिसांना माहिती दिली.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सोमवारी मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली. जवळपास तीन तास चाललेल्या या चौकशीदरम्यान भन्साळींनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी सुशांतला आपण  कोणत्याही चित्रपटातून वगळले नाही किंवा त्याला रिप्लेसही केले नाही. तसेच, भन्साळींनी दोन नव्हे तर चार चित्रपटांची ऑफर सुशांतला दिली होती. या चारही चित्रपटांबद्दल त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

संजय लीला भन्साळी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले, 'सुशांतला मी चार चित्रपट ऑफर केली होते, ते म्हणजे 'गोलियों की रासलीला राम-लीला','बाजीराव-मस्तानी', 'रीड '(जो बनला नाही) आणि 'पद्मावत' हे होते. रामलीलाच्या वेळी सुशांत सिंह राजपूतचा YRF (यशराज फिल्म्स) सोबत कॉन्ट्रॅक्टमध्ये होता आणि  'पानी' चित्रपटाच्या वर्कशॉपमध्ये भाग घेत होता. ज्यामुळे त्याने रामलीला करण्यास नकार दिला.

"त्याचप्रमाणे बाजीराव-मस्तानी, रीड, आणि पद्मावत (शाहिद कपूरने साकारलेली भूमिका) साठी मी सुशांतला संपर्क साधला होता पण त्याने आपल्या सर्व तारखा पानी या चित्रपटासाठी दिल्या होत्या", असे भन्साळींनी सांगितले.

  • 'पानी' हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता

भन्साळी म्हणाले, 'या तिन्ही चित्रपटांसाठी मला जे डेडिकेशन आणि समर्पण हवे होते, ते सुशांत देऊ शकत नव्हता. कारण 'पानी' हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि म्हणूनच तो त्याच्या तयारीमध्ये पूर्णपणे गुंतला होता.'

  • मी कुणाच्याही शिफारशीवर काम करत नाही

भन्साळींनी पोलिसांना सांगितले की, मी माझ्या चित्रपटाच्या कास्टिंगचा निर्णय स्वत: घेतो, म्हणून मी कोणाच्या सांगण्यावरून किंवा एखाद्याच्या शिफारशीवरून कलाकाराला कास्ट करण्याचा प्रश्नच उपस्थित राहात नाही. भन्साळी यांच्या म्हणण्यानुसार, 'सुशांत सिंह राजपूतला रामलीला हा चित्रपट ऑफर करण्यापूर्वी मी अभिनेता इम्रान अब्बासकडेही भूमिकेसाठी संपर्क साधला होता.'

'यानंतर भन्साळी प्रॉडक्शनने सुशांतशी संपर्क साधला पण तो YRF सोबत कॉन्ट्रॅक्टमध्ये होता आणि त्याच्या तारखा आधीच ब्लॉक होत्या. त्यानंतर आम्ही रणवीर सिंगशी संपर्क साधला, ज्याचे बँड बाजा बारात आणि लेडीज वर्सेस रिकी बहल हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांमधील त्याच्या अभिनय आणि रोमँटिक भूमिकेमुळे मी त्याला कास्ट केले', अशी माहिती भन्साळी यांनी पोलिसांना दिली. 

  • सुशांतकडे 'रीड' या चित्रपटासाठी देखील तारखा नव्हत्या

ते पुढे म्हणाले, 'रीड हा माझा एक प्रोजेक्ट होता, जो सुरु होऊ  शकला नाही. यामागील कारण कंटेंट आणि प्रॉडक्शनसंदर्भातील काही तांत्रिक समस्या होती. या चित्रपटासाठीसुद्धा मी 2014 मध्ये सुशांतशी संपर्क साधला आणि चर्चाही केली पण ते होऊ शकले नाही. या चित्रपटासाठीही सुशांतचा डेट इश्यू होता.'

  • सुशांतला 'पद्मावत'मध्ये घेण्याचा प्रयत्न केला

भन्साळी म्हणाले, 'पद्मावत बनवतानाही मला शाहिद कपूरच्या भूमिकेसाठी सुशांतला घ्यायचे होते. पण सुशांतने पानी या चित्रपटासाठी तारखा दिल्याचे सांगून यासाठी नकार दिला होता.' भन्साळी यांच्या म्हणण्यानुसार, 'सुशांतने आपली 4 वर्षे फक्त पानी चित्रपटाला दिली आणि या काळात त्याने इतर कोणालाही वेळ दिला नाही'.

  • एखाद्याच्या दबावात येऊन सुशांतच्या जागी रणवीरला घेतले नाही

चित्रपटात सुशांत ऐवजी रणवीर सिंगला कास्ट करण्याच्या प्रश्नावर भन्साळींनी पोलिसांना सांगितले, 'गोलियों की रासलीला राम-लीला  किंवा बाजीराव-मस्तानी बनवताना YRF  टॅलेंट विभागाकडून कोणत्याही  प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात आला आणि त्यानंतर सुशांतच्या जागी रणवीरला घेण्यात आले, हा आरोप बिनबुडाचा आहे.रणवीर सिंगला कास्ट करण्याचा निर्णय माझा होता आणि YRF ला कोणत्याही कलाकाराला कास्ट करण्यासाठी  रॉयल्टी देण्यात आली नाही.'

संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटांच्या कराराची एक प्रत मुंबई पोलिसांना दिली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser