आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा:प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे निधन, उद्या प्रदर्शित होतोय त्यांचा शेवटचा चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी आहे. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे आज (4 मे) सकाळी पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गेले काही महिने स्वप्नील मयेकर आजारी होते. त्यांचा 'मराठी पाऊल पडते पुढे' हा चित्रपट उद्या म्हणजेच 5 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. 'मराठी पाऊल पडते पुढे' हा स्वप्नील मयेकर यांचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता.

ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांच्यासोबत स्वप्नील मयेकर
ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांच्यासोबत स्वप्नील मयेकर

स्वप्नील यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्याशिवाय त्यांनी एका भोजपुरी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'मराठी पाऊल पडते पुढे' हा चित्रपट त्यांची शेवटची कलाकृती ठरला आहे. या चित्रपटात अभिनेता चिराग पाटील, सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या कलाकारांनी काम केले आहे.

अभिनेता चिराग पाटीलसोबत स्वप्नील मयेकर, चिराग पाटीलने 'मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.
अभिनेता चिराग पाटीलसोबत स्वप्नील मयेकर, चिराग पाटीलने 'मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.