आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनामुळे प्रसिद्ध संगीतकाराचा मृत्यू:'आशिकी' चित्रपटाला संगीतबद्ध केलेल्या नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचे निधन

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नदीम-श्रवण जोडीने आपल्या संगीताच्या जोरावर 90चे दशक गाजवले होते

लोकप्रिय चित्रपट 'आशिकी'साठी संगीत देणारी प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम श्रवणमधील श्रवण राठोड यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. डायबिटिकसोबतच कोरोनामुळे त्यांचे फुफ्फुस पूर्णपणे संक्रमित झाले होते. श्रवण यांच्यावर रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. गीतकार समीर यांनी श्रवण यांच्या निधनाची पुष्टी केली.

नदीम-श्रवण जोडी
नदीम-श्रवण जोडी

अनेक अवयन निकामी झाले होते

रहेजा हॉस्पिटलचे डॉ. किर्ती भूषण यांनी श्रवण यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. डॉ. भूषण यांनी सांगितले की, श्रवण यांचे निधन रात्री 9:30 वाजता झाले. आम्ही आमच्याकडून त्यांना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. श्रवण यांचा मृत्यू कोरोना संक्रमणामुळे झालेले कार्डियोमायोपॅथी होते. यामुळे पल्मोनरी एडिमा आणि मल्टीपल ऑर्गन फेलियर झाले होते.

समीर म्हणाले- माझा मित्र गेला

प्रसिद्ध गीतकार समीर अंजान यांनी भावुक होऊन आमच्याशी बातचीच केली. ते म्हणाले- "माझा प्रिय मित्र गेला. माझ्या शब्दांना चाल देऊन लोकांच्या मना-मनात पोहचवणारा संगीतकार गेला. इतक्या लवकर काय गेलास मित्रा. ईश्वर तुला आपल्या चरणात स्थान देवो."

आपल्या संगीताने 90चे दशक गाजवले होते
श्रवण बॉलिवुडमधील प्रसिद्ध संगीतकार होते. त्यांनी संगीतकार नदीमसोबत मिळून अनेक चित्रपटांना आपले संगीत दिले होते. नदीम-श्रवणची जोडी 90च्या दशकातील प्रसिद्ध जोडी होती. त्यांनी 'जीना सीख लिया'मधून बॉलिबूडमध्ये पदार्पण केले होते. पण, त्यांना खरी ओळख 'आशिकी'चित्रपटाने मिळवून दिली.

बातम्या आणखी आहेत...