आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे आज सकाळी निधन झाल्याचे वृत्त आहे. मृत्यूसमयी तो केवळ 35 वर्षांचा होता. गेल्या अनेक महिन्यांपासून तो किडनीच्या आजाराने ग्रस्त होता. तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्याचे निधन झाले. आदित्य हा अरुण व अनुराधा यांचा मुलगा होता. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नियमांचे पालन करत मुंबईत आदित्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आदित्य पौडवालने आईकडूनच गायनाचे धडे घेतले होते. तोदेखील भजन गात असे. म्युझिक अरेंजर, निर्माता अशी आदित्यची संगीतविश्वात ओळख होती. याच वर्षाच्या सुरुवातीला एका मुलाखतीत आदित्यने भक्ती संगीतावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले होते. सर्वात कमी वयाचा संगीत दिग्दर्शक म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आदित्यचे नाव नोंदवले गेले आहे.
अनुराधा पौडवाल यांचे पती अरुणसुद्धा संगीतकार होते. नव्वदच्या दशकात अनुराधा पौडवाल करिअरच्या शिखरावर होत्या. त्यावेळी त्यांचे पती अरुण यांचे निधन झाले. अरुण आणि अनुराधा पौडवाल यांना एक मुलगी असून कविता पौडवाल हे तिचे नाव आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.