आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हॅपी बर्थडे:रणवीर सिंहच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी शाळेत दिले संगणक, दरवर्षी या खास दिवशी करतात गरजूंना मदत 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता रणवीर सिंहचा आज वाढदिवस आहे.

अभिनेता रणवीर सिंहच्या वाढदिवशी त्याच्या फॅन क्लबने वंचित मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एका शाळेला संगणक दिले आहेत. हा क्लब 2015 पासून सक्रिय आहे. दरवर्षी या क्लबचे सदस्य रणवीरच्या वाढदिवशी काहीतरी वेगळे करत असतात. अलीकडेच त्यांनी 'रणवीर ग्राम प्रोग्राम' हा कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याअंतर्गत त्यांनी  मध्य प्रदेशातील इंदूर नजीकच्या सिकंदरी गावात संगणकांचे वितरण केले. 

रणवीरियन अथर्व खांडेकरने सांगितले, "रणवीरचा फॅन क्लब वंचित आणि गरजू मुलांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतो. या वेळी आम्ही ग्रामीण भागातील पैशांअभावी उच्च शिक्षण घेऊ न शकणा-या मुलांची मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मूलभूत शिक्षण हेदेखील एक स्वप्न आहे. 'रणवीर का फॅन क्लब'चे सदस्य म्हणून आम्ही या मुलांना मूलभूत संगणक प्रणाली आणि काही इनडोअर गेम्स देण्याचे विचार करीत आहोत. ही मुले शाळेत येताना किती उत्साही असतील याची कल्पना करा.”

पाचवीपर्यंत शिक्षण देणा-या शाळेत हे संगणक दिले जातील. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील सिकंदरी या गावातील एक शाळा आहे. अथर्व पुढे म्हणाले, “या प्रकल्पाचे एकूण बजेट 30 हजार रुपये असून त्यापैकी 15 हजार रुपये दोन बेसिक संगणकांसाठी, 10हजार रुपये शाळेच्या भिंती रंगविण्यासाठी आणि पाच हजार रुपये मुलांना इनडोअर गेम्स देण्यासाठी खर्च केले जातील.'

दरवर्षी गरजुंना करतात मदत

मागील वर्षी, या फॅन क्लबने अकोली नावाच्या छोट्याशा गावात दिवे लावले होते, तिथे त्यांनी प्रत्येक घरात वीज आणि पाच सोलर स्ट्रीट लाइट लावले होते. गावकरी अनेक वर्षांपासून रॉकेलचे दिवे वापरत होते आणि ते वीजेचा खर्च परवडत नव्हता. 

0