आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहते भावूक:जान्हवीच्या फोन वॉलपेपरमध्ये दिसला श्रीदेवीचा फोटो, चाहते म्हणाले- आजही तिच्या डोळ्यात आईला गमावल्याचे दुःख दिसते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री जान्हवी कपूर नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. यावेळी ती एका बिल्डिंगमधून बाहेर पडत तिच्या कारच्या दिशेने जाताना दिसली. गाडीत बसताच जान्हवीने तिचा फोन चार्जिंगला लावला. यावेळी तिच्या मोबाइल फोनच्या वॉलपेपरवर तिचा आणि तिची आई श्रीदेवीचा फोटो पाहायला मिळाला. सोशल मीडियावरही जान्हवीचा हा व्हिडिओ समोर आला आहे.

वॉलपेपर पाहून चाहते म्हणाले - जान्हवीला तिच्या आईची उणीव कायम भासत असेल
जान्हवीच्या फोन वॉलपेपरमध्ये आई श्रीदेवीसोबतचा तिचा बालपणीचा फोटो दिसत आहे. सोशल मीडियावर चाहते यावर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'जान्हवीला तिच्या आईची उणीव कायम भासत असेल. आजही तिच्या डोळ्यात आईला गमावल्याचे दुःख स्पष्ट दिसते.'

जान्हवीने तिच्या मोबाइलच्या वॉलपेपरवर आईसोबतचा हा फोटो शेअर केला आहे.
जान्हवीने तिच्या मोबाइलच्या वॉलपेपरवर आईसोबतचा हा फोटो शेअर केला आहे.

चाहत्याने पुढे लिहिले, 'एखाद्या मुलीसाठी आईला कायमचे गमावणे हे आयुष्यातील सर्वात मोठे दु:ख आहे. जान्हवी तिच्या करिअरमध्ये आणि आयुष्यात चांगली कामगिरी करत आहे. पण, आज तिचे हे यश पाहण्यासाठी तिची आई तिच्यासोबत नाही.'

कॅज्युअल लूकमध्ये दिसली जान्हवी कपूर
समोर आलेल्या व्हिडिओत जान्हवी कॅज्युअल लूकमध्ये दिसतेय. तिने ग्रे कलरचे ग्राफिक स्वेटशर्ट आणि क्रीम कलरची प्लाझो पँट घातली आहे. तिने केस मोकळे सोडले.

मी जे काही करते त्याची सुरूवात तुझ्यापासून करते आणि शेवटीही- जान्हवी 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचा दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. त्यांचे पती बोनी कपूर यांना त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. जान्हवी कायम सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर करत असते.

अलीकडेच एक नोट शेअर करत जान्हवीने लिहिले होते, "मम्मा मी अजूनही तुला सगळीकडे शोधत आहे… सध्या मी ते सर्व करते आहे ज्याचा तुला अभिमान वाटेल… मी जे काही करते त्याची सुरूवात तुझ्यापासून करते आणि शेवटीही".