आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मेहंदी'च्या अभिनेत्याला नेमके काय झाले होते:फराज खानला सुपुर्द-ए-खाक केल्यानंतर कामावर परतला त्याचा भाऊ फाहमान, म्हणाला - त्याला एक दुर्मिळ आजार होता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाहमान आणि फराज खान. फोटो सौजन्य- स्पॉटबॉय.
  • अभिनेता फराज खानचे 3 नोव्हेंबर रोजी बंगळुरूमधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते.

'मेहंदी' आणि 'फरेब' यासारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता फराज खानचे 3 नोव्हेंबर रोजी वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. फराजला सुपुर्द-ए-खाक केल्यानंतर शूटिंग कमिटमेंटमुळे त्याचा भाऊ फाहमान याला दुस-याच दिवशी मुंबईला परत यावे लागले. अलीकडेच छोट्या पडद्यावर सुरु झालेल्या 'अपना टाइम आएगा' या मालिकेत तो डॉ. वीर प्रताप सिंह राजावत हे पात्र साकारत आहे.

गुरुवारी फाहमान मुंबईला परतला आणि त्याच दिवशी त्याने शूटिंग सुरू केली. एका एंटरटेनमेंट वेबसाइटशी बोलताना फाहमानने फराजच्या आजाराविषयी सांगितले. सोबतच भावाच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचे त्याने सांगितले.

भावाला दुर्मिळ आजार होता: फाहमान

स्पॉटबॉयशी बोलताना फाहमान म्हणाला, "खरे सांगायचे तर त्याचा आजार दुर्मिळ होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्याच्या शरीरात जो विषाणू होता तो प्राणघातक विषाणू नव्हता. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, त्याच्या शरीरात जो बॅक्टेरिया होता, त्याने असे बॅक्टेरिया विकसित केले जे अँटिबायोटिक्सला शरीरात काम करु देत नव्हते."

रोग प्रतिकारशक्ती खूप कमी झाली होती

फाहमानने सांगितल्यानुसार, "माणसाच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमीतकमी 700 असायला हवी, परंतु त्याची प्रतिकारशक्ती 23.9 पर्यंत घसरली होती. त्यामुळे शरीरावर कोणतेही अँटिबायोटिक काम करत नव्हते. मला नेमकी मेडिकल टर्म आठवत नाही, परंतु त्याच्या मेंदुत एक विषाणू आला होता, ज्यामुळे त्याला बराच त्रास झाला आणि त्यानंतर त्याच्या शरीराने काम करणे थांबवले."

फराज जवळपास दीड वर्षांपासून आजारी होता

फाहमानने सांगितल्यानुसार, फराज मागील दीड वर्षांपासून आजारी होता. तो म्हणाला, "तो तब्बल दीड वर्षांपासून आजारी होता. सुरुवातीला त्याला क्षयरोग झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. या काळात त्याच्या शरीरात वेगवेगळ्या बॅक्टेरियांचे कॉम्बिनेशन झाले."

शूटवरून परत येताच भावाच्या मृत्यूची बातमी मिळाली

फाहमान म्हणतो, "मी माझ्या कुटूंबाशी सतत संपर्कात होता. ज्या दिवशी सकाळी मला त्याची प्रकृती ढासळल्याचे समजले, त्याच रात्री 9.40 वाजता मला त्याच्या निधनाची बातमी मिळाली. ज्यावेळी त्याने अखेरचा श्वास घेतला त्यावेळी माझा आणखी एक भाऊ, त्याची पत्नी आणि माझी चुलत बहीण रुग्णालयात हजर होते. ही बातमी आली तेव्हा मी नुकतेच शूटिंग करुन घरी पोहोचलो होतो. त्याच्या दुस-या दिवशी सकाळी त्याच्या अंत्यदर्शनासाठी मी बंगळुरुला पोहोचलो."