आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतचे शेवटचे गाणे:फराह खानने फी न घेता कोरिओग्राफ केले होते 'दिल बेचारा'चे शीर्षक गीत, सुशांतने एका टेकमध्ये दिला होता परफेक्ट शॉट  

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतने सिंगल टेकमध्ये ओके शॉट दिल्याचे सांगितले जाते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट म्हणजे 'दिल बेचारा'. या चित्रपटातील त्याच्यावर चित्रीत झालेले शीर्षक गीत शुक्रवारी रिलीज केले जाणार आहे. हे टायटल साँग कोरिओग्राफर फराह खानने कोरिओग्राफ केले होते. दैनिक भास्करला या गाण्याच्या सेटवरची काही छायाचित्रे मिळाली आहेत. सुशांतने सिंगल टेकमध्ये ओके शॉट दिल्याचे सांगितले जाते. 

याबद्दल बोलताना दिग्दर्शक मुकेश छाबरा म्हणाले की, 'हे गाणे माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. सुशांत सिंह राजपूतच्या कारकीर्दीतील हे शेवटचे गाणे आहे. हे फराह खान यांनी कोरिओग्राफ केले होते. मी त्यांना फराह दीदी म्हणतो. माझ्या एका शब्दावर त्या गाणे कोरिओग्राफ करायला आल्या. कोरिओग्राफीसाठी त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले नाहीत. त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण कास्ट आणि डान्सर्ससोबत रिहर्सलही केली होती. हे गाणे फक्त एका टेकमध्ये शूट करण्यात आले आहे. फक्त एका शॉटमध्ये. सुशांत एक चांगला डान्सर होता आणि त्याने हे काम अत्यंत सहजतेने केले.' 

'दिल बेचारा'चे गाणे कोरियोग्राफ करताना फराह खान.
'दिल बेचारा'चे गाणे कोरियोग्राफ करताना फराह खान.

फराह खाननेही सुशांतबद्दलचे आपले अनुभव सांगितले. ते म्हणाले, 'सुशांत काही वर्षांपूर्वी एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटी जज म्हणून सहभागी झाला होता. तिथे आमची पहिली भेट झाली. तो एकमेव सेलिब्रिटी जज होता, जो स्पर्धकांपेक्षा चांगला नाचला. म्हणून जेव्हा मुकेशने मला दिल बेचारासाठी कोरियोग्राफ करण्यास सांगितले तेव्हा मी लगेच हो म्हणाले. मला माहित होते की, सुशांत खूप सहज डान्स करेल.'

शॉट देताना सुशांत.
शॉट देताना सुशांत.

फराह पुढे म्हणाली, 'हे गाणेही माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. कारण मी पहिल्यांदा सुशांतला कोरिओग्राफ केले होते. आम्ही दोघे ब-याच काळापासून मित्र होतो, पण कधी एकत्र काम केले नव्हते. मी मुकेशला वचन दिले होते की, जेव्हा तो दिग्दर्शक होईल तेव्हा मला त्याच्यासाठी एक गाणे कोरिओग्राफ करायला नक्कीच आवडेल. मुकेशशी माझे वेगळे नाते आहे. तो मला बहीण मानतो. पाच वर्षांपूर्वी मी या लहान भावाला दत्तक घेतले होते. मला त्याच्या दिग्दर्शनाच्या प्रवासात सहभागी व्हायचे होते.'

सुशांत सिंह राजपूतसोबत सेल्फी घेणारी फराह खान
सुशांत सिंह राजपूतसोबत सेल्फी घेणारी फराह खान
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser