आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Farah Khan: Farah Khan Danced Behind The Stars To Pay Off Debts, Learned Dance By Watching TV At Neighbor's House And Became Best Choreographer Of Bollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे फराह खान:कर्ज फेडण्यासाठी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायची फराह खान, शेजा-यांच्या घरी टीव्ही पाहून शिकली नृत्य आणि बनली बेस्ट कोरिओग्राफर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरोज खानमुळे चित्रपटांत मिळाला ब्रेक

बॉलिवूडमधील मोठमोठ्या सेलिब्रिटींना आपल्या इशा-यावर नाचवणारी फराह खान आज 56 वर्षांची झाली आहे. लहान वयातच फराहच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले. वडिलांच्या निधनानंतर तिने आपल्या कुटूंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि चित्रपटांमध्ये बॅकग्राऊं डान्सर म्हणून काम करण्यास सुरवात केली. परिश्रम आणि कौशल्यामुळे आज फराह खान केवळ बॉलिवूडमधील यशस्वी नृत्य दिग्दर्शिकाच नव्हे तर एक उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शिका आहे. मात्र तिचा हा प्रवास सोपा नव्हता. फराहच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फराहचा बॅकग्राऊंड डान्सर ते बेस्ट कोरिओग्राफरपर्यंतचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया -

घराची जबाबदारी उचलण्यासाठी बनली डान्सर

फराह खानचे वडील कामरान खान हे बी-ग्रेड चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्मिता आणि अभिनेता होते. या काळात त्यांनी 'ऐसा भी होता है' या ए-ग्रेड चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. या चित्रपटासाठी फराहच्या वडिलांनी घर, दागदागिने, सर्व किंमती वस्तू विकल्या होत्या. त्यानंतर फरहाच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा झाला आणि येथूनच त्यांच्या संघर्षाचे दिवस सुरु झाले. या घटनेच्या काही दिवसांतच कामरान खान यांचे निधन झाले. त्यानंतर जवळपास 15 वर्षे फराह आणि तिच्या कुटुंबाला संघर्ष करावा लागला. घराचा खर्च उचलण्यासाठी फराहने काही लोकांच्या मदतीने डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली आणि कलाकारांच्या मागे डान्स करु लागली.

शेजार्‍यांच्या घरी टीव्ही पाहून शिकली नृत्य

मायकल जॅक्सनचे गाणे थ्रिलर रिलीज झाल्यावर फराहला नृत्यात आवड निर्माण झाली. फराह या गाण्याने इतकी प्रभावित झाला की तिने नृत्य शिकण्याचे ठरवले. मात्र यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. हलाखीच्या परिस्थितीमुळे घरात टीव्ही नव्हता. अशा परिस्थितीत फराह आपला छंद पूर्ण करण्यासाठी शेजारा-यांच्या घरी जायची. शेजार्‍यांकडे टीव्ही आणि व्हीसीआर होता, टीव्हीवर मायकल जॅक्सनला बघून फराह त्याला कॉपी करत असे. फराह नेहमीच मायकल जॅक्सनला आपला आयडॉल मानते. हलाखीची परिस्थिती आणि सुखसोयी नसतानादेखील फराहने नृत्य कौशल्य मिळवले.

सरोज खानमुळे चित्रपटांत मिळाला ब्रेक
चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत असताना फराहने कलाकारांना नवी डान्स स्टेप्स शिकवायला सुरुवात केली. 1993 मध्ये जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी सरोज खान यांनी मध्येच बंद केली. या चित्रपटासाठी फराह सरो खान यांची असिस्टंट होती. सरोज खान यांनी काम बंद केल्याने फराहला चित्रपटातील पहला नशा हे गाणं कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली. हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्यानंतर शाहरुख खानच्या चित्रपटातील कभी हा कभी ना हे गाणं करण्याची संधी तिला मिळाली होती. या चित्रपटाच्या सेटवर फराहची शाहरुखसोबत मैत्री झाली होती.

फराह खानने कोरिओग्राफर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर तिने चित्रपट दिग्दर्शनात पाऊल ठेवले. 2004 मध्ये आलेल्या मैं हू ना हा चित्रपट फराहने दिग्दर्शित केला होता. यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. त्यानंतर फराहने शाहरुखसोबत ओम शांती ओम आणि हॅपी न्यू इयर हे दोन चित्रपट केले.

बातम्या आणखी आहेत...