आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Farah Khan Kunder Shares Photo With Zayn Marie And Said In 1992 Her Father Mansur Khan Gave Me A Break And Now His Daughter Makes Her Debut In Our Film.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योगायोग:फराहने आमिर खानच्या पुतणीसोबतचा फोटो केला शेअर, म्हणाली- वडिलांनी मला संधी दिली होती आणि आता मी मुलीला दिली

मुंबई  एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फराह खान कुंदरने बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात 1992 च्या 'जो जिता वही सिकंदर' या चित्रपटाद्वारे केली होती.

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माती फराह खान कुंदरने गुरुवारी आपल्या इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती आमिर खानची पुतणी आणि दिग्दर्शक मन्सूर खानची मुलगी जाइन खानसोबत दिसतेय. हा फोटो शेअर करताना फराहने सांगितले की, 28 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी मला पदार्पणाची संधी दिली होती, आता तिने आमच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.

फराहने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, '1992 मध्ये हिचे वडील मन्सूर खान यांनी मला 'जो जीता वही सिकंदर'मध्ये कोरिओग्राफर म्हणून संधी दिली होती...  28 वर्षांनंतर त्यांची मुलगी जाइन खानने आमच्या 'मिसेस सीरियल किलर' चित्रपटातून पदार्पण केले आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.'

जाइनने दिले उत्तर 

यानंतर, जाइनने तिच्या इंस्टा स्टोरीवर एक पोस्टही शेअर केली. ज्यात तिने  सांगितले की, 'अब्बू नेहमीच फराहबद्दल प्रेमळपणे बोलतात.  माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती फराह करणार असल्याचे कळल्यानंतर त्यांना आनंद झाला होता. खरोखर हा एक आनंदी योगायोग आहे.'

आमिरची पुतणी आहे जाइन

जाइन सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता नासिर हुसैन यांची नात आणि मन्सूर खान यांची मुलगी आहे. आमिर आणि मन्सूर चुलतभाऊ आहेत. मन्सूर यांचे वडील नासिर हुसैन यांचे धाकटे भाऊ ताहिर हुसैन यांचा आमिर मुलगा आहे.  मन्सूर यांनी 1988 मध्ये 'कयामत से कयामत तक' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. आमिरनेही याच चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. यानंतर 1992 मध्ये मन्सूर यांनी पुन्हा एकदा आमिरबरोबर 'जो जीता वही सिकंदर' बनवला. ज्यामध्ये त्यांनी फराहला नृत्यदिग्दर्शक म्हणून संधी दिली होती. त्यांनी आमिरबरोबरचा तिसरा चित्रपट 1995 मध्ये आलेला 'अकेले हम, अकेले तुम' हा बनवला होता.

नेटफ्लिक्सच्या चित्रपटाद्वारे डेब्यू जाइनने अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्म 'नेटफ्लिक्स वर रिलीज झालेल्या 'मिसेस सीरियल किलर' चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. चित्रपटाची निर्मिती फराह खान कुंदरने केली आहे, तर लेखक आणि दिग्दर्शक तिचा पती शिरीष कुंदर आहे. जाइन व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, मनोज बाजपेयी आणि मोहित रैना या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले.  हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...