आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चित्रपट निर्माती-दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने वयाच्या 43 व्या वर्षी IVF च्या मदतीने आई होण्याचा निर्णय घेतला होता. तिला अन्या, कजार आणि डीवा अशी तीन मुले आहेत. तिघेही आता 12 वर्षांची झाले आहेत. अलीकडेच फराहने मातृत्व मिळवण्याबाबत एक ओपन लेटर लिहिले आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. IVF च्या माध्यमातून मातृत्व मिळवण्याचा विषय मांडणार्या सोनी एन्टरटेन्मेन्ट टेलिव्हिजनवरील 'स्टोरी 9 मंथ्स की' या मालिकेचे देखील तिने कौतुक केले आहे. ती लिहिते, “एक मुलगी, पत्नी आणि आई म्हणून मला अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि या निवड करण्याच्या स्वातंत्र्यातूनच मी कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माती झाले आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मला जाणवले की, योग्य वेळ आहे, त्यावेळी मी माझ्या मनाचे ऐकले आणि निवड केली, मग ते माझे करियर असो, किंवा कुटुंब. आपण लोक काय म्हणतील याचा खूप जास्त विचार करतो; हे आपले जीवन आहे आणि निर्णय आपला असला पाहिजे हे आपण विसरतो.”
ती पुढे म्हणते, “आज मी तीन मुलांची आई आहे, त्याचे कारण मी केलेली निवड हेच आहे. मी जेव्हा स्वतः तयार होते, तेव्हा मी आई होण्याचे मान्य केले, समाजाने ठरवलेल्या ‘योग्य वयात’ नाही. वैज्ञानिक प्रगतीमुळे त्या वयातही IVF च्या साहाय्याने मी आई होऊ शकले. आज हे बघून आनंद होतो की अधिकाधिक स्त्रिया लोकापवादाला न जुमानता हा मार्ग अवलंबत आहेत, ज्यामुळे हळूहळू समाजाची मानसिकताही बदलते आहे आणि स्वतःच्या आनंदावर स्त्रिया स्वतःच अधिकार ठेवत आहेत. ''
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.