आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फराह खानने खास अंदाजात SRK ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा:म्हणाली - एक अशी व्यक्ती ज्याच्यामुळे मी चित्रपट निर्माती झाले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार शाहरुख खान आज 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. शाहरुखची इंडस्ट्रीतील सर्वात जवळची मैत्रीण फराह खान हिनेदेखील खास अंदाजात शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फराहने एक सुंदर व्हिडिओ शेअर करत शाहरुखचा उल्लेख 'Mine' असा केला आहे. कॅप्शनमध्ये फराहने लिहिले, "Mine!! माझा शाह, माझा मित्र, मेगास्टार, एक अशी व्यक्ती ज्याच्यामुळे मी चित्रपट निर्माती झाले. जो बॉलिवूडचा बादशाह असूनही नम्र आहे. ज्याच्याकडे स्वतःवरच जोरात हसण्याची हिंमत आहे. जो चित्रपटांपेक्षाही मोठा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा शाहरुख खान. तुझा मला खूप अभिमान वाटतो. तू जसा आहेस त्यासाठी तुझे आभार." शाहरुख खानने फराह खानसोबत ‘मैं हूँ ना’, ‘ओम शांती ओम’, ‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...