आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये मदत:फराहच्या मुलीने स्केच बनवून जमवले 70 हजार रुपये, भटक्या प्राण्यांच्या आहारावर केले जातील खर्च   

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे सर्व पैसे कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे प्रभावित प्राण्यांच्या आहारावर खर्च केले जातील.

नृत्यदिग्दर्शिका आणि निर्माती फराह खानने आपल्या चाहत्यांसोबत एक खास बातमी शेअर केली आहे. लॉकडाऊन दरम्यान इंस्टा पोस्ट लिहिताना फराहने सांगितले की, तिची 12 वर्षांची मुलगी अन्याने पाळीव प्राण्यांचे स्केचेस बनवून ते विकले आणि त्यातून 70 हजार रुपये जमा केले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व पैसे कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे प्रभावित प्राण्यांच्या आहारावर खर्च केले जातील.

फराहने गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर सांगितले होते की, बेघर आणि भटक्या प्राण्यांना मदत करण्यासाठी अन्याने पाळीव प्राण्याचे स्केच बनवून एक हजार रुपयात विकण्याचा निर्णय घेतला आहे.

फराहने रविवारी ट्विट केले की, 'माझी 12 वर्षांची मुलगी अन्याने पाळीव प्राण्यांचे स्केचेस बनवले आहेत आणि त्यांना प्रति स्केच एक हजार रुपयांना विकले आहे. गेल्या पाच दिवसांत 70 हजार रुपये यातून जमा झाले ​​आहेत. हे सर्व पैसे भटक्या व गरजू जनावरांच्या आहारासाठी वापरण्यात येणार आहेत.' तिने लिहिले, "स्केचचे ऑर्डर देऊन दान केल्याबद्दल सर्व दयाळू लोकांना धन्यवाद."

यापुर्वीही, अन्याने तिच्या पिगी बँकेत जमा केलेल्या बचतीतून 30 निराधार डॉगीजच्या अन्नाची व्यवस्था केली होती. फराहने याबद्दल सांगितले होते आणि या कार्यात मदत केल्याबद्दल शाजिया गोवारीकर, पेटा इंडियाचे अशर मीत, मुंबई विद्यापीठ आणि डॉग फूडचा कौटुंबिक व्यवसाय चालविणा-या उम्मेद यांचे आभार मानले होते.

बातम्या आणखी आहेत...