आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता फरदीन खान शनिवारी दिग्दर्शक मुकेश छाबरा यांच्या ऑफिसच्या बाहेर दिसला आणि त्याला बघून चाहते आश्चर्यचकित झाले. फरदीनने आपले वाढलेले वजन बरेच कमी केले असून तो आता पुर्वीसारखा दिसतोय. त्याचे हे ट्रान्सफॉर्मेशन बघून त्याचे फॅन्स अतिशय आनंदी आहेत. 47 वर्षीय फरदीन बॉलिवूडमध्ये पुनरागमनाची तयारी करत आहे.
फरदीनचे ट्रान्सफॉर्मेशन बघून चाहत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया
मीडियाला सांगितली होती मन की बात
वाढलेल्या वजनामुळे फरदीनला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. दोन वर्षांपूर्वी चुलत बहीण फराह अलीच्या बुक लाँचवेळी फरदीनने हजेरी लावली होती. त्यावेळी मीडियाने त्याला ट्रोलिंगवर प्रश्न विचारले होते. तेव्हा तो म्हणाला होता की, 'मला ठरवून टार्गेट बनवले जाते. लोकांनी आता यापुढे जायला हवे. मी आता कुठलीही काळजी करत बसत नाही आणि मी आयुष्यात आनंदी आहे. जेव्हाही मी स्वतःला आरशात बघतो, तेव्हा मला आनंदी वाटते. मी जसा आहे, तसे स्वतःला स्वीकारले आहे. आता माझ्याविषयी कुठे काय लिहिले जाते, ते मी वाचत नाही', असे फरदीनने सांगितले होते.
असे आहे फरदीनचे करिअर
फरदीन खानचे चित्रपट करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. 1998 मध्ये आलेल्या 'प्रेम अगन' या चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता. त्यानंतर तो 'जंगल' (2000), 'प्यार तूने क्या किया'
(2000), 'हम हो गए आपके' (2001), 'खुशी' (2002), 'देव' (2004), 'प्यारे मोहन' (2005) ), 'लाइफ पार्टनर' (२००)) आणि 2010 मध्ये आलेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटांमध्ये काम केले, पण फरदीनचा एकही सोलो चित्रपट हिट ठरला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.