आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरहान-शिबानी मेहंदी सेरेमनी:शिबानी दांडेकरने शेअर केले मेहंदी सेरेमनीचे फोटो, पती फरहान अख्तरसोबत डान्स करताना दिसली

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फरहान-शिबानीने एक दिवसापूर्वी लग्नाचे फोटो शेअर केले होते

अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि गायिका शिबानी दांडेकर यांनी एक दिवसापूर्वी त्यांच्या लग्नाचे अधिकृत फोटो शेअर केले होते. आता शिबानी दांडेकरने तिच्या मेहंदी सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले आहेत. फरहानने 19 फेब्रुवारीला त्याची गर्लफ्रेंड शिबानीसोबत त्याचे वडील जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील 'सुकून' या फार्म हाऊसवर लग्न केले.फरहान-शिबानीच्या लग्नाआधीच्या हळदी-मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे फोटोही समोर आले होते. दोघांचे लग्नाआधीचे सोहळे मुंबईतील वांद्रे येथील फरहानच्या घरी पार पडले.

शिबानी दांडेकरने मेहंदी समारंभातील फोटो शेअर केले आणि लिहिले, "दोन जीवाभावाच्या मैत्रीणी, माझ्या बहिणी, माझा संरक्षक, माझ्या जोडीदाराने मला सर्वात अविश्वसनीय मेहंदी लावली. माझ्या लग्नात आणि आयुष्यात नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्याबद्दल पायल सिंघल आणि निहाली कोटियां यांना माझे खूप प्रेम. मला माहित आहे की तुम्हा दोघांनाही माझ्यासाठी हे खूप दिवसांपासून करायचे होते त्यामुळे मला वाटते की तुमची स्वप्ने पूर्ण झाली आहेत. तुमच्या प्रेमाचे आणि निष्ठेचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, फक्त आनंदाश्रू आहेत. या सर्वांसाठी धन्यवाद. मी या आठवणी कायम जपून ठेवेन."

फरहान-शिबानीने एक दिवसापूर्वी लग्नाचे फोटो शेअर केले होते
लग्नाचे फोटो शेअर करत फरहानने कॅप्शनमध्ये लिहिले होते, "काही दिवसांपूर्वी मी आणि शिबानी दांडेकरने आम्ही एकत्र येण्याचा आनंद साजरा केला आणि त्या दिवशी आमच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करणाऱ्या सर्वांचे आम्ही खूप आभारी आहोत. या सेलिब्रेशनचे काही मौल्यवान क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे. आम्ही एकत्र प्रवास सुरू करत आहोत. आमच्या सर्वांकडून तुम्हाला खूप खूप प्रेम." शिबानी दांडेकरनेही लग्नातील फोटो शेअर करत लिहिले, "मिस्टर अँड मिसेस माझे पती फरहान अख्तर. माझ्या आयुष्यातील सर्वात जादुई दिवस."

या लग्नात हृतिकसह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते
फरहान-शिबानीच्या खंडाळ्यात झालेल्या या लग्नात कुटुंबातील सदस्य, दोघांचे जवळचे मित्र, रितेश सिधवानी, हृतिक रोशन, अमृता अरोरा, डिनो मोरिया आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांसारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. फरहान-हृतिकने त्यांच्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटातील गाण्यांवरही जबरदस्त डान्स केला. लग्नाचे अनेक अनधिकृत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

फरहान-शिबानी 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते
फरहान-शिबानी जवळपास 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि लिव्ह-इनमध्ये राहत होते. दोघांनी मिळून पाळीव प्राणीही दत्तक घेतले होते. फरहान आणि शिबानी या दोघांनीही काही काळ आपले नाते लपवून ठेवले होते. मात्र 2018 साली त्यांनी आपले नाते ऑफिशिअल केले होते. फरहानचे शिबानीसोबत हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न हेअरस्टायलिस्ट अधुनाशी झाले होते. पहिल्या लग्नापासून फरहानला दोन मुलीही आहेत.

फरहान अख्तरचे आगामी प्रोजेक्ट्स
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर फरहान अख्तर शेवटचा 'तुफान' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि परेश रावलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट गेल्या वर्षी 16 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता.

फरहान अख्तर सध्या त्याच्या आगामी 'जी ले जरा' चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2022 च्या उत्तरार्धात फ्लोरवर जाणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...