आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरहानची लव्ह स्टोरी:नाईट क्लबमध्ये 6 वर्षांना मोठ्या अधुनाला पाहताच क्षणी प्रेमात पडला होता फरहान, 16 वर्षांनी घेतला घटस्फोट आणि शिबानीच्या प्रेमात पडला

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज फरहान दुस-यांदा लग्नगाठीत अडकतोय.

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक फरहान अख्तर गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत 19 फेब्रुवारीला लग्न करणार आहे. शिबानीच्या आधी फरहानने सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट अधुनासोबत लग्न केले होते, पण हे लग्न 16 वर्षांनी तुटले. अधुनासोबत फरहानने लव्ह मॅरेज केले होते, पहिल्या लग्नापासून त्याला दोन मुलीही आहेत. चला जाणून घेऊया कशी आहे फरहानची लव्ह लाईफ, घटस्फोट आणि पुन्हा जोडीदार गवसण्याची कहाणी-

फरहान- अधुनाची पहिली भेट
फरहान अधुनाला 1997 मध्ये भेटला होता. त्याकाळात त्याची करिअरमध्ये कोणतीही प्रगती केली नव्हती. जुहू येथील नाईट क्लबमध्ये दोघांची भेट झाली होती. फरहानची बहीण झोया अख्तर हिने दोघांची भेट घालून दिली होती. पहिल्या भेटीनंतर दोघेही एकमेकांना आवडू लागले होते.

कोण आहे अधुना भबानी?
अधुना भबानी ही एक ब्रिटिश महिला आहे जिचा जन्म लिव्हरपूल यूके येथे झाला होता. अधुना एक लोकप्रिय हेअरस्टायलिस्ट आणि बी ब्लंटची मालकीण आहे. अधुनाने 1998 मध्ये तिच्या सलून ज्यूसची स्थापना केली होती, ज्याला तिने नंतर बी ब्लंट असे नाव दिले. हा भारतातील लोकप्रिय ब्रँड आहे.

काही भेटीनंतर, फरहान आणि अधुना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 2000 मध्ये लग्न केले. लग्नाच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2001 मध्ये फरहानने 'दिल चाहता है' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.

अधुनाने 'दिल चाहता है' या चित्रपटातून हेअरस्टाइलिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अधुना फरहानच्या प्रत्येक चित्रपटात एकत्र काम करू लागली. 'लक्ष्य' या चित्रपटात तिने प्रीती झिंटा आणि हृतिकसाठी स्टायलिंगही केले होते.

या लग्नापासून अधुना आणि फरहानला शाक्या आणि अकिरा या दोन मुली आहेत. 2016 मध्ये या दोघांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना धक्का दिला होता.

एका वर्षानंतर, 24 एप्रिल 2017 रोजी दोघे अधिकृतपणे वेगळे झाले. घटस्फोटानंतर अधुनाला दोन्ही मुलींचा ताबा मिळाला होता.

फरहान-अधुनाचे लग्न का मोडले?
घटस्फोटापूर्वी पासून अधुनाचे नाव डिनो मोरियाचा मोठा भाऊ निकोलो मोरियाशी जोडले गेले होते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अधुना आणि निकोलोचे नाते त्यांच्या घटस्फोटाचे कारण होते. दुसरीकडे घटस्फोटानंतर पुढच्याच वर्षी फरहानने शिबानीसोबतचे नाते अधिकृत केले होते.

शिबानी दांडेकरशी पहिली भेट
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांची पहिली भेट 2015 मध्ये एका रिअॅलिटी शोमध्ये झाली होती. फरहान हा शो होस्ट करत होता तर शिबानी त्याची स्पर्धक होती. या शोचे नाव होते यू कॅन डू इट. हा शो जेव्हा सुरु होता त्यावेळी फरहान आणि अधुना यांचा घटस्फोट झाला नव्हता.

अधुना आणि फरहानच्या घटस्फोटानंतर शिबानी दांडेकरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून रिलेशनशिपचे संकेत दिले होते. फोटोमध्ये शिबानी तिच्या मिस्ट्री मॅनसोबत दिसली होती, जो दुसरा कोणी नसून फरहान होता.

अनेक रुमर्सनंतर, फरहानने 2018 साली सोशल मीडिया पोस्टद्वारे जगासमोर उघडपणे आपल्या नात्याची कबुली दिली होती.

जवळपास 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर फरहान अख्तर शिबानी दांडेकरसोबत लग्न करत आहे. 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार लग्न केल्यानंतर हे जोडपे 21 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत.

लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी शिबानीने तिच्या मानेवर फरहानच्या नावाचा टॅटू बनवला होता.

बातम्या आणखी आहेत...