आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता जन्माचे सोबती झाले फरहान-शिबानी:फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे खंडाळ्याच्या फार्महाऊसवर झाले लग्न; हृतिक, आलिया आणि रिया चक्रवर्तीही पोहोचले

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फरहान-शिबानीसह त्यांच्या कुटुंबीयांना लग्न अत्यंत गुप्त आणि खासगी ठेवायचे आहे.

अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि गायिका शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी शनिवारी त्यांचे वडील जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न केले. शुक्रवारी रात्री या जोडप्याचा संगीत सोहळा होता. वृत्तानुसार, संगीत समारंभात फरहानने त्याची भावी वधू शिबानी हिला खास डान्स परफॉर्मन्स डेडिकेट केला होता.

रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, जवळच्या मित्रांव्यतिरिक्त, आलिया भट्ट, रितेश सिधवानी, हृतिक रोशन, आमिर खान, डिनो मोरिया आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांसारख्या इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही या जोडप्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान-शिबानीसह त्यांच्या कुटुंबीयांना लग्न अत्यंत गुप्त आणि खासगी ठेवायचे आहे.

बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अनुषा दांडेकर पोहोचली होती.
बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अनुषा दांडेकर पोहोचली होती.
जावेद अख्तर फार्महाऊसवर स्पॉट झाले होते.
जावेद अख्तर फार्महाऊसवर स्पॉट झाले होते.

फरहान-शिबानी 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते
रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानीने लग्नासाठी सब्यसाचीचे कपडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या जोडप्याला सध्या त्यांच्या आउटफिटबद्दल कोणतीही माहिती समोर येऊ द्यायची नव्हती. फरहान-शिबानी जवळपास 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लिव्ह-इनमध्ये राहत होते. दोघांनी मिळून पाळीव प्राणीही दत्तक घेतले होते.

2018 मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृत केले
फरहान आणि शिबानी या दोघांनीही काही काळ आपले नाते लपवून ठेवले होते. मात्र 2018 साली त्यांनी आपले नाते ऑफिशिअल केले होते. फरहानचे शिबानीसोबत हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न हेअरस्टायलिस्ट अधुनाशी झाले होते. पहिल्या लग्नापासून फरहानला दोन मुलीही आहेत.

बातम्या आणखी आहेत...