आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरहान-शिबानीचे लग्न:फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 21 फेब्रुवारीला लग्न करणार, वडील जावेद अख्तर यांनी केली पुष्टी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेडिंग प्लानर लग्नाची तयारी करत आहेत

अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि गायिका शिबानी दांडेकर 21 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. फरहानचे वडील आणि बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की दोघेही 21 तारखेला त्यांच्या लग्नाची नोंदणी करतील आणि त्यानंतर एक छोटासा सेलिब्रेशन होईल.

वेडिंग प्लानर लग्नाची तयारी करत आहेत
लग्नाबाबत जावेद म्हणाले, हे दोघे 21 फेब्रुवारीला कोर्टात लग्नाची नोंदणी करणार आहेत. यानंतर खंडाळा येथील फार्महाऊसवर कुटुंब आणि मित्रांसोबत एक इंटिमेट सेलिब्रेशन होईल. लग्नाच्या सर्व तयारीवर वेडिंग प्लानर्स लक्ष ठेवून आहेत. ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सेलिब्रेशन अगदी लहान ठेवत आहोत. अजून कुणालाही इन्व्हिटेशन पाठवली नाहीत.

आम्हा सर्वांना शिबानी आवडते
शिबानीबद्दल बोलताना जावेद म्हणाले, ती खूप छान मुलगी आहे. आम्हा सर्वांना ती खूप आवडते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फरहान आणि शिबानी एकमेकांना पसंत करून लग्न करत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे.

फरहान-शिबानी जवळपास 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत
रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानीने लग्नासाठी सब्यसाचीचे आउटफिट घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या जोडप्याला सध्या त्यांच्या आउटफिटबद्दल काहीही कळू द्यायचे नाही. फरहान-शिबानी जवळपास 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लिव्ह-इनमध्ये राहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...