आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऐतिहासिक आणि भव्य चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे शेवटचे दोन चित्रपट 'मोहनजोदारो' आणि 'पानिपत' ला हवे तसे यश मिळाले नव्हते. म्हणूनच आता दिग्दर्शकाने काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला आहे, जेणेकरून तो परत रुळावर येऊ शकेल. गोवारीकर आता एक अॅक्शन चित्रपट बनवणार असल्याची बातमी आहे. त्यात ते फरहान अख्तरला मुख्य भूमिकेत घेणार आहेत.
View this post on InstagramA post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on Sep 21, 2020 at 8:20am PDT
अद्याप निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव निश्चित केले नाही, परंतु बातमीनुसार, फरहान या चित्रपटात वन रेंजरच्या भूमिकेत असेल. या बिग बजेट चित्रपटाबद्दलही चर्चा आहे की, प्रख्यात गीतकार जावेद अख्तर ही कथा लिहित आहेत. या माध्यमातून ते पंधरा वर्षानंतर पटकथा लेखनात परतणार आहेत.
त्यासोबतच फरहान आणि जावेद पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. पुढील वर्षापर्यंत यावर काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. वनसंवर्धनाचा मुद्दा गांभीर्याने घेण्यास हा चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.