आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेल्या तुफानचा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 16 जुलै रोजी होणार ग्लोबल प्रीमिअर होणार आहे. रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. 'तुफान' हा या वर्षातील सर्वात भव्य स्पोर्ट्स ड्रामा ठरणार आहे. भारत आणि जगभरातील 240 हून अधिक देशांत हा चित्रपट बघता येणार आहे.
या चित्रपटात फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल यांच्यासह सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 'भाग मिल्खा भाग' या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी 'तुफान' मधून एक दमदार पंच पुन्हा एकदा घेऊन आली आहे.
ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे.
'तुफान'मध्ये बॉक्सिंग एक खेळ म्हणून जिवंत होतोच. शिवाय, आपल्या स्वप्नांचा वेध घेताना आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य माणसाचा जीवनप्रवासही यात रेखाटला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.