आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

47 वर्षांचा झाला फरहान अख्तर:17 वर्षे टिकले अधुनासोबतचे फरहान अख्तरचे पहिले लग्न, आत सात वर्षांनी वर्षांनी मॉडेल शिबानीला करतोय डेट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2001 मध्ये सुरू झाले होते फरहानचे करिअर

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर 47 वर्षांचा झाला आहे. 9 जानेवारी 1974 रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला होता. फरहानची आई हनी इराणी आणि वडील जावेद अख्तर हे दोघे पटकथा लेखक आहेत. त्याची बहीण झोया अख्तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि लेखिका आहे. फरहान लहान असताना त्याचे वडील जावेद अख्तर यांनी बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरे लग्न केले होते. फरहान त्याच्या सावत्र आईशी चांगले बाँडिंग आहे. दोघेही बर्‍याच ठिकाणी एकत्र दिसतात.

2001 मध्ये सुरू झाले होते फरहानचे करिअर

फरहानने 2001 मध्ये 'दिल चाहता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तर अभिनेता म्हणून तो पहिल्यांदा 'रॉक ऑन' (2008) चित्रपटात झळकला होता. अभिनेता आणि दिग्दर्शकासोबतच फरहान एक गायक देखील आहे आणि त्याने 'रॉक ऑन' मधून बॉलिवूडमध्ये गायक म्हणूनही पाऊल ठेवले. त्याने 20 हून अधिक चित्रपटांमध्ये योगदान दिले आहे. यापैकी काही चित्रपटांमध्ये तो अभिनेता म्हणून झळकला तर काही चित्रपटांसाठी त्याने दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली. 'रॉक ऑन' (2008), 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' (2011) आणि 'शादी के साइड इफेक्ट' (2014) या चित्रपटांसाठी त्याने पार्श्वगायन देखील केले आहे.

पहिले लग्न तुटले
फरहान अख्तर पत्नी अधुनापासून विभक्त झाला आहे. दोघांनी 2000 मध्ये लग्न केले होते आणि 17 वर्षे त्यांनी एकत्र संसार केला. 2017 मध्ये या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. या दोघांनीही आपल्या अधिकृत निवेदनात लिहिले होते की, 'मी (फरहान) आणि अधुना परस्पर संमतीने एकमेकांपासून विभक्त होत आहोत. आमची मुले आमची प्राथमिकता असतील. आम्ही त्यांची काळजी घेणार आहोत. तर्कवितर्क लावू नयेत,' असे ते म्हणाले होते.

'दिल चाहता है' च्या सेटवर झाली होती भेट
फरहान-अधुनाची गणना बॉलिवूडमधील स्टाइलिश कपलमध्ये व्हायची. अधुनाने बॉलिवूडमध्ये हेअरस्टाइलिस्ट म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोघांची भेट 'दिल चाहता है' च्या सेटवर झाली होती. अधुना फरहानपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. दोघांनी तीन वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न केले होते. त्यांना शाक्या आणि अकिरा या दोन मुली आहेत.

शिबानी दांडेकरला करतोय डेट

घटस्फोटानंतर फरहान त्याच्यापेक्षा सात वर्षांनी लहान असलेली मॉडेल आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर हिला डेट करत आहे. 2015 मध्ये 'आय कॅन डू दॅट' या शो दरम्यान त्यांची भेट झाली होती. फरहान हा शो होस्ट करायचा आणि शिबानी त्याच शोचा एक भाग होती. 40 वर्षीय शिबानीने सलमानच्या 'सुलतान' चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर ती एक मॉडेल आणि गायिकाही आहे.

ती प्रसिद्ध एमटीव्ही व्हीजे, अभिनेत्री आणि गायिका अनुषा दांडेकरची बहीण आहे. शिबानीच्या करिअरबद्दल सांगायचे म्हणजे तिने 2014 मध्ये आलेल्या ‘टाइमपास’ या चित्रपटातील आयटम साँगद्वारे करिअरची सुरुवात केली. यानंतर 2015 मध्ये ती 'रॉय' आणि 'शानदार' या चित्रपटांमध्ये झळकली.

बातम्या आणखी आहेत...