आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेल्या काही दिवसांपासून देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता अभिनेता सोनू सूदने एक पोस्ट शेअर कलेी आहे. मात्र त्याची ही पोस्ट पाहून नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत. सोनू तुला नेमके काय बोलायचे आहे, ते खुलेपणाने बोल, असे नेटक-यांनी सोनूला म्हटले आहे.
‘गलत को सही कहोगे तो नींद कैसे आएगी?’ असे एका वाक्यात सोनू सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे. जर चुकीच्या गोष्टीला तुम्ही बरोबर बोलत असाल तर झोप कशी येणार? असे सोनूने म्हटल्यावर नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले पण अनेक जणांना त्याला नेमके काय म्हणायचे आहे? असा प्रश्न पडला आहे.
गलत को सही कहोगे तो नींद कैसे आएगी?
— sonu sood (@SonuSood) February 4, 2021
नेटकरी म्हणाले - भावा, तू खुलेपणाने बोल, तुला कशाची भीती वाटते
सोनूने ही पोस्ट शेतकरी आंदोलनावर केल्याचे नेटकरी म्हणत आहेत. या पोस्टसह त्याने सरकार आणि त्यांचे समर्थन करणा-या बॉलिवूड कलाकारांवर सोनूने टीका केली आहे. त्याच्या या पोस्टवर नेटक-यांनी त्याला प्रश्नदेखील विचारला आहे. ‘भावा तू खुलेपणाने बोल, तुला कशाची भीती वाटते?’ अशी कमेंट एका नेटक-याने केली आहे.
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सरकारला पाठिंबा दर्शविला
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी 2 महिन्यांहून अधिक काळापासून आंदोलन करत आहेत. अलीकडेच पॉप स्टार रिहाना, मिया खलिफा यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यानंतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी सरकारला पाठिंबा देताना आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींवर टीका केली. बाहेरच्यांनी यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, ही भारताची अंतर्गत बाब असे भारतीय सेलिब्रिटींनी म्हटले आहे. .
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.