आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निदर्शने करणा-या शेतक-यांची धमकी:बॉबी देओलच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवल्यानंतर म्हणाले-  पंजाब, हरियाणामध्ये देओल कुटुंबीयांना चित्रीकरण करु देणार नाही

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...म्हणून देओल कुटुंबावर नाराज आहेत शेतकरी

शुक्रवारी निदर्शने करणा-या शेतकर्‍यांच्या एका गटाने पंजाबच्या पटियालामध्ये सुरु असलेले बॉबी देओल, विक्रांत मैसी आणि सान्या मल्होत्रा ​​स्टारर 'लव्ह हॉस्टेल'चे शूटिंग थांबवले. रिपोर्ट्सनुसार, ही घटना घडली तेव्हा कलाकार सेटवर हजर नव्हते. परंतु क्रू मेंबर्स सेटवर चित्रीकरणाची तयारी करत होते. शेतक-यांनी त्यांना काम थांबवून तिथून निघण्यास सांगितले. यानंतर सर्व क्रू मेंबर्स सेटवरील सामान घेऊन तिथून निघून गेले. पंजाब आणि हरियाणा येथे देओल कुटुंबीयांना चित्रीकरण करु देणार नाही, असा पवित्रा आंदोलन करणा-या शेतक-यांनी घेतला आहे.

म्हणून देओल कुटुंबावर नाराज आहेत शेतकरी

या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये सामील असलेला बॉबी देओल हा भारतीय जनता पक्षाच्या निकटवर्तीय असलेल्या देओल कुटुंबातील आहे, असे या शेतक-यांच्या गटातील एका प्रतिनिधीने माध्यमांना सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, "बॉबी देओलचा भाऊ सनी देओल हे भाजपा खासदार आहेत. आई हेमा मालिनी या भाजपा खासदार आणि आणि वडील धर्मेंद्र हे भाजपाचे माजी खासदार आहेत. शेतकरी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, मात्र देओल कुटुंबातील कुणीही शेतक-यांच्या या आंदोलनाविषयी काहीच बोलेले नाही. मात्र पॉपस्टार रिहानाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी सरकारच्या बाजुने मत मांडले. रिहानाची पोस्टवर हेमा मालिनी यांनी दिलेली प्रतिक्रिया ही शेतक-यांच्या विरोधातील आहे," असे या आंदोलन करणा-या शेतक-यांचे म्हणणे आहे.

हेमा मालिनी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये काय लिहिले?

हेमा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, "परदेशी सेलिब्रिटींना पाहून मी चकित झाले आहे, त्यांच्यासाठी आमचा देश भारत हे फक्त एक नाव आहे. जे त्यांनी ऐकले आहे, ते आमच्या अंतर्गत घडामोडी आणि धोरणांबद्दल वक्तव्य करत आहेत. ते काय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुणाला आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीही हेमा मालिनी यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच माहित नाही की त्यांना काय हवे आहे. नव्या कृषी कायद्यांबाबत समस्या काय आहेत हे देखील त्यांना माहित नाही यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होत असल्याचे हेमा मालिनी यांनी म्हटले होते.

जान्हवीच्या चित्रपटाचे शूटिंग जानेवारीत बंद करण्यात आले होते
जानेवारीत विरोधकांनी पटियालामध्ये सुरु असलेल्या जान्हवी कपूरच्या ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते. यानंतर निर्मात्यांनी शूटिंगचे वेळापत्रक पंजाबमधील चंदीगड आणि त्यानंतर लुधियानासारख्या इतर शहरांमध्ये हलवले होते.