आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब्सचे ट्रान्सफॉर्मेशन:एकेकाळी 100 किलो होते जरीन खानचे वजन, या अभिनेत्रीसुद्धा होत्या लठ्ठ, नंतर झाल्या Fat To Fit

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया...

फॅट टु फिट अभिनेत्रींच्या यादीत जरीन खानच्या नावाचा समावेश आहे. चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर जरीन खान कॉल सेंटरमध्ये जॉब करायची. त्यावळी तिने कधीही अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार केला नव्हता. जरीनने सांगितले होते की, तिला अभ्यासाची आवड होती आणि तिला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्यावेळी तिचे वजन 100 किलो होते. आर्थिक अडचण असल्याने ती कॉल सेंटरमध्ये जॉब करायची, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

2010 मध्ये सलमान खान स्टाटर 'वीर' चित्रपटात जरीनला ड्रीम रोल मिळाला. यासाठी जरीनने तिचे 30 किलो वजन कमी केले. मात्र इथवरच तिला थांबून चालणार नव्हते. जरीनला वाढत्या वजनामुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. नंतर अगदी फिट होण्यासाठी तिने योगा, कार्डिओ आणि स्पेशल वेट लॉस ट्रेनिंग घेतले. याचा परिणाम म्हणजे जरीन आता अगदी फिट झाली आहे. एका मुलाखतीत जरीन म्हणाली होती, मी माझे वजन स्वतःसाठी नव्हे तर मीडियासाठी कमी केले आहे. कारण तुम्ही सगळे मला सतत क्रिटिसाइज करत होते.

जरीन खानपूर्वी अनेक अभिनेत्रींनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी बॉडी ट्रान्सफॉर्मेनशन केले आहे. कोणत्या आहेत या अभिनेत्री जाणून घेऊया...

सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन तब्बल 99 किलो होते. करिअरच्या दृष्टीने सोनाक्षीने आपले वाढलेले वजन बरेच कमी केले. सलमान खानच्या सांगण्यावरुन तिने स्वतःचे वजन कमी केले होते. 'दबंग' सिनेमाच्या शुटिंगपूर्वी सोनाक्षीने 30 किलो वजन कमी केले होते. 'तेवर' या सिनेमासाठी सोनाक्षीने जिममध्ये बरीच मेहनत घेतली होती. आता सोनाक्षी अगदी फिट दिसते आणि आपल्या फिटनेसवर ती काम करते. अभिनयात येण्यापूर्वी सोनाक्षी फॅशन डिझायनिंग करत होती.

सोनम कपूर
सोनम कपूरला स्टाईल आयकॉन म्हणून ओळखले जाते. 'सावरिया' या पहिल्या सिनेमाच्या वेळी सोनम कपूरचे वजन 86 किलो होते. मात्र नंतर तिने 30 किलो वजन कमी करुन स्वतःला फिट बनवले. सोनम याकाळात बॉलिवूडची सर्वाधिक फिट अॅक्ट्रेस आहे. शिवाय तिच्या ड्रेस सेन्सचेही विशेष कौतुक होत असते.

आलिया भट्ट
महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची लाडकी कन्या आलिया भट हिने स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमाद्वारे सिल्व्हर स्क्रिनवर एन्ट्री घेतली आणि पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बबली गर्ल म्हणून ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. स्टुडंट ऑफ द इयर'नंतर आलियाने एकामागून एक हिट सिनेमे दिले. पडद्यावर अतिशय ग्लॅमरस दिसणारी आलिया एकेकाळी गोलमटोल होती, यावर तुमचा विश्वास बसेल का... मात्र हे खरे आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी आलिया बरीच लठ्ठ होती. तिचे वजन 67 किलो होते. मात्र सिनेमाची ऑफर आल्यानंतर तिने आपल्या फिगरवर लक्ष केंद्रित केले आणि तीन महिन्यांत 16 किलो वजन कमी करुन पडद्यावर अवतरली.

सारा अली खान
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानचे कॉलेजच्या दिवसांत 96 किलो वजन होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर साराने फिटनेसकडे लक्ष केंद्रित केले. आणि 30 किलो वजन कमी केले. आज सारा ही सर्वात फिट अभिनेत्री आहे. सारा कायम तिचे जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन तिच्या चाहत्यांना मोटिवेट करताना दिसते.

भूमी पेडणेकर

‘दम लगा के हईशा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या भूमी पेडणेकरने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने सगळ्यांना चकित केले आहे. एकीकडे लोक मोहक आणि सडपातळ दिसण्याचा प्रयत्न करतात, मात्र भूमीने आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन वाढवले होते. यानंतर, भूमी अक्षय कुमार सोबत 'टॉयलेट: एक प्रेम कथा' चित्रपटात दिसली. या चित्रपटातील तिचा फिट लूक बघून सगळे अवाक् झाले होते. या चित्रपटासाठी भूमीने काही महिन्यांतच आपले वजन 85 किलोहून 56 किलो केले होते.

पीहू संद
फन्ने खां या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री पीहू संदने या चित्रपटासाठी 20 किलो वजन वाढवले ​​होते. पीहूने मुलाखतीत सांगितले होते की, तिने भूमी पेडणेकरकडून चित्रपटात वजन वाढवण्याची प्रेरणा घेतली होती. या चित्रपटात पीहूने अनिल कपूरची मुलगी लता शर्माची भूमिका साकारली होती. लताची गायिका बनण्याची इच्छा असते.

बातम्या आणखी आहेत...