आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौजन्या मृत्यू प्रकरण:अभिनेत्रीच्या वडिलांनी कन्नड अभिनेता आणि असिस्टंटला मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझी मुलगी ठीक होती, तिचे दागिनेही गायब आहेत

कन्नड टीव्ही अभिनेत्री सौजन्या हिने बंगळुरुमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. कुंबलागोडू पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्या प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. सौजन्याचे वडील प्रभु मडप्पा यांनी कन्नड आणि तेलुगु अभिनेता विवेक आणि सहाय्यक महेश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस दोघांची चौकशी करत आहेत. सौजन्याच्या वडिलांचा आरोप आहे की, विवेक त्यांच्या मुलीला त्रास देत असे. विवेकने सौजन्यावर लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

माझी मुलगी ठीक होती, तिचे दागिनेही गायब आहेत
सौजन्याचे वडील म्हणाले, "माझी मुलगी ठीक होती, मी तिला नुकतेच पैसे दिले होते. तिचे सोन्याचे दागिने देखील गायब आहेत. महेशने पोलिस येण्याची वाट पाहिली नाही आणि माझ्या मुलीचा मृतदेह काढून टाकला होता. सौजन्याचा मोबाइलही गायब आहे. मोबाइल सापडला की सगळं काही समोर येईल." दरम्यान, कुंबलागोडू पोलिसांनी सौजन्याच्या आईवडिलांच्या उपस्थितीत तिच्या संपूर्ण अपार्टमेंटची तपासणी केली. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

अभिनेत्याने आरोपांवर प्रतिक्रिया दिली

विवेकने त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर सांगितले, माझ्यावरील सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी मी पोस्टमार्टम अहवालाची वाट पाहत आहे. मी आता काहीही बोलणार नाही. मी सौजन्याला एक वर्षाहून अधिक काळापासून ओळखत होतो. ती जेव्हा कधी अस्वस्थ होत असे, तेव्हा ती मला भेटायची. ती खूप शांत मुलगी होती.

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी सौजन्याने चार पानांची चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठीत सौजन्याने लिहिले होते, "माझी मानसिक स्थिती चांगली नाही आणि मी आता अजून सहन करू शकत नाही.' आत्महत्येमागील नेमके कारण पोलिसांनी अद्याप उघड केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...