आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या वडिलांचे मोठे पाऊल:वडील के.के. सिंह यांनी स्वत:ला सुशांतचा कायदेशीर वारस घोषित केले, म्हणाले- आता माझ्या परवानगीशिवाय सुशांतबद्दल काहीही सांगणे बेकायदेशीर ठरेल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • के.के. सिंह म्हणाले- कुटुंबीयांशिवाय इतर कुणालाही सुशांतबद्दल आता काहीही सांगण्याचा अधिकार नाही.
  • काही वकिलांनी मीडियात सांगितले होते की, त्यांना सुशांतने नियुक्त केले होते.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी बुधवारी स्वतःला आपल्या मुलाचा कायदेशीर वारस असल्याचे घोषित केले आहे. ते म्हणाले की, सुशांत हयात असताना त्याने ज्या वकिल, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि प्रोफेशनल्सला नियुक्त केले होते, त्यांचा कार्यकाळ आता संपला आहे. त्यांना सुशांतबद्दल काहीही सांगण्याचा आता अधिकार नाही. जर कोणी असे करत असेल तर त्यांना सर्वप्रथम माझी परवानगी घेणे आवश्यक आहे. सुशांतच्या कुटुंबात आता मी आणि त्याच्या बहिणींचा समावेश आहे.

  • आता कुणी सुशांतच्या वतीने काही विधान केले तर ते बेकायदेशीर ठरेल

काही वकिलांनी सुशांतने त्यांची नियुक्ती केल्याचे वक्तव्य मीडियात केले होते. त्यानंतर के.के. सिंह यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. के.के. सिंह म्हणाले की, या कथित वकिलांनी सुशांतसोबत झालेल्या संभाषणाबाबत माध्यमांना सांगितले. बार काऊंसिलऑफ इंडिया आणि इंडियन एव्हिडन्स अ‍ॅक्टच्या नियमांनुसार असे करता येत नाही.

  • मी व माझ्या कुटुंबाशिवाय इतर कुणीही कुटुंब असल्याचा दावा केल्यास ते चुकीचे ठरेल

के.के. सिंह पुढे म्हणाले, सुशांतच्या कुटूंबात फक्त मी आणि त्याच्या बहिणींचा समावेश आहे हे मी स्पष्ट करतो. आम्ही वरुण सिंह यांना आमचा वकील म्हणून नेमले होते आणि त्यांच्यामार्फत ज्येष्ठ वकील विकास सिंह आमच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...