आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलक तिवारीकडे नाहीये वडिलांसाठी वेळ:वडील राजा चौधरीचा खुलासा - ती खूप बिझी आहे, माझ्या कॉललाही उत्तर देत नाही

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पलककडे नाहीये वडिलांसाठी वेळ

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा पुर्वाश्रमीचा पती राजा चौधरीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याची मुलगी पलक तिवारीसोबतच्या त्याच्या बाँडिंगबद्दल सांगितले. सोबतच राजाने सांगितल्यानुसार, श्वेता तिवारीसोबतही त्याचे कोणतेही संभाषण होत नसून अनेक वर्षांपूर्वी तिने त्याचा नंबर ब्लॉक केला आहे.

पलककडे नाहीये वडिलांसाठी वेळ

जेव्हा राजाला पुढे विचारण्यात आले की त्याची मुलगी पलक त्याच्या संपर्कात आहे का? तर त्याचे उत्तर देताना राजा म्हणतो, 'मी पलकला शेवटचे ती लहान असताना पाहिले होते. पलक खूप बिझी आहे. तिच्याकडे तिच्या वडिलांसाठी वेळ नाहीये. बरं, मी तिला कॉल करत नाही, मी फक्त तिला मेसेज करतो किंवा ईमेल करतो आणि नंतर तिच्या उत्तराची प्रतीक्षा करतो. कारण तिला भेटण्याची संधी मला कधीच मिळत नाही. पण ती माझ्या मेसेजला उत्तरही देत ​​नाही, एकंदरीत एकतर ती खूप बिझी आहे किंवा ती माझ्याकडे दुर्लक्ष करतेय, असे दिसते," असे राजाने सांगितले.

पलकने 'रोझी - द सैफ्रॉन चॅप्टर'मधून केली करिअरची सुरुवात

पलकची आई श्वेता तिवारी हिने वयाच्या 19 व्या वर्षी राजा चौधरीशी लग्न केले होते. मात्र, 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. श्वेताने राजावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. पलक ही श्वेता आणि राजा यांची मुलगी आहे.

पलकच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 'रोझी - द सैफ्रॉन चॅप्टर' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर 'अंतिम: द फायनल ट्रुथ' मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...