आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Father Salim Khan Said On Salman's 'Radhe' This Is Not A Great Film, But Commercial Films Have Accountability, So That Everyone Can Get Money

इंटरव्ह्यू:'राधे'नंतर सलमानचे करिअर संपल्याचे सांगणा-या समीक्षकांना सलीम खान यांचे उत्तर, म्हणाले -  एक हिट सिनेमा येताच चारही बाजूंनी सलमान-सलमान ऐकू येऊ लागते

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'राधे' सिनेमावर वडिलांचे स्पष्टीकरण

ईदला रिलीज झालेला सलमान खानचा ‘राधे’ समीक्षकांच्या निशाण्यावर हाेता. सोशल मीडियावरदेखील सिनेमाची थट्टा करण्यात आली होती. सलमानसारखे मोठे तारे अशा प्रकारचे चित्रपट का करतात ? यावर त्यांचे वडील आणि अनेक सुपरहिट चित्रपटांचे लेखक सलीम खान यांनी दिव्य मराठीशी चर्चा केली. त्या मुलाखतीचा एक भाग -

  • ‘राधे’ सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणेच असल्याचे समीक्षकांचे मत आहे. याविषयी तुम्ही काय सांगणार ?‌

यापूर्वी सलमानचा ‘दबंग 3’ आला होता. तो खूपच वेगळा होता. ‘बजरंगी भाईजान’ तर खूपच वेगळा होता. मी मान्य करतो ‘राधे’ ग्रेट सिनेमा नाही, मात्र कमर्शियल सिनेमावर एक जबाबदारी असते. प्रत्येक कलाकाराला त्याचे पैसे मिळावेत. यात आर्टिस्टपासून ते कलाकार, निर्माता आणि वितरक आणि एक स्टेकहोल्डर यांना पैसे मिळायला हवेत. यावरूनच सिनेमा बनवण्याचे चक्र सुरू असते. यावर सलमानने काम केले आहे. त्यामुळे सिनेमाचे स्टेकहोल्डर फायद्यात आहेत.

  • सलमानने कधी त्याच्यासाठी तुम्हाला लिहिण्याचे सांगितले का ?

काही कल्पना तर आहेत. त्यावर काम करण्याची इच्छा आहे. मात्र सलमानसोबत काही लिहिले त्याचा काय फरक पडेल. खरं तर चांगला चित्रपट बनवण्यासाठी बराच त्याग करावा लागतो. आता सलमानसारख्या स्टारच्या सिनेमाता िवविध प्रयोग केले जातात. हेच सर्व ऐकायला मिळते. त्यामुळे खूप अडचणी येतात. आमच्या काळात जे सिनेमे हिट व्हायचे त्यात लेखकांना सृजनात्मक संतुष्टी मिळायची.

  • सलमानसाठी लेखकांवर खर्च करून चित्रपट का नाही लिहिला ?

सिने इंडस्ट्रीची ही एक मोठी अडचण आहे, येथे चांगले लेखकच नाहीत. त्याचे कारण लेखक हिंदी किंवा उर्दूतील साहित्य वाचत नाहीत. बाहेरचे पाहून त्याचे भारतीयीकरण करतात. आजपर्यंत इंडस्ट्रीला सलीम-जावेद यांची रिप्लेसमेंट मिळाली नसल्याचे दु:ख आहे. त्यामुळे सलमान एकटा काय करेल?

  • सलमानचे करिअर संपल्याचे समीक्षकांचे मत आहे, काय वाटते ?

ते तर प्रत्येक वेळेस सलमानला अपेक्षेपेक्षा कमीच लेखतात. खरं तर सलमानचा एखादा हिट सिनेमा आला तर चोहीकडून फक्त सलमान-सलमानच ऐकू येते.

बातम्या आणखी आहेत...