आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानचे दुसरे लग्न मोडले:आमिर खानच्या घटस्फोटाच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये फातिमा सना शेख , 'दंगल गर्ल'ने यापूर्वीच अफवांना दिला पुर्णविराम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फातिमाने आमिरबरोबरचे नाते नाकारले होते

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे दुसरे लग्नही मोडले आहे. आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण यांनी अधिकृत निवेदन जारी करुन ही बातमी दिली आहे. आमिर खानच्या घटस्फोटाची बातमी समोर येताच ‘दंगल गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली 29 वर्षीय फातिमा सना शेख सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये आहे. आमिर आणि फातिमा यांनी 2016 मध्ये आलेल्या ‘दंगल’ या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात एकत्र काम करताना त्यांच्यात जवळीक निर्माण झाल्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

यानंतर, जेव्हा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटासाठी फातिमा सना शेखला साइन केले गेले होते, तेव्हा आमिरच्या शिफारशीवरुनच तिला चित्रपटात कास्ट करण्यात आल्याचेही म्हटले गेले होते. पण तेव्हा फातिमाला कास्ट करण्याचा निर्णय आमिरचा नव्हता तर क्रिएटीव्ह टीमने तिची निवड केली, असे स्पष्टीकरण किरण रावने दिले होते. त्यावेळी आमिर फातिमाच्या व्यक्तिरेखेवर अधिक लक्ष देत असल्याचीही चर्चा झाली होती. त्यामुळे अभिनेत्री कतरिना कैफ नाराज असल्याचेही समोर आले होते.

फातिमाने आमिरबरोबरचे नाते नाकारले होते
फातिमाने आमिर खानसोबत तिच्या अफेअरच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले होते. आमिर आपला मेंटॉर असल्याचे तिने म्हटले होते. कुछ तो लोग कहेंगे असे म्हणत आमिरसोबतच्या अफेअरच्या चर्चांना फातिमाने पूर्णविराम लावला होता. फातिमा म्हणाली होती, 'अज्ञात लोक आमच्याबद्दल काहीही विचार करतात किंवा बोलत राहतात. कधीकधी या गोष्टींचा माझ्यावरही परिणाम होतो. पण आता मी या सर्व गोष्टींसह जगायला शिकत आहे' आमिरने मात्र याबाबत कायम मौनच बाळगले.

फातिमाने बालकलाकार म्हणून करिअरची केली सुरुवात
1997 मध्ये आलेल्या ‘चाची 420’ या चित्रपटात फातिमा बाल कलाकार म्हणून झळकली होती. चित्रपटात तिने कमल हासनच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने 'वन टू का फोर', 'बडे दिलवाला' सारख्या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले होते.

त्यानंतर फातिमा 'बिट्टू बॉस' आणि 'आकाशवाणी' सारख्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून दिसली. मात्र, त्याला खरी ओळख 2016 मध्ये आलेल्या 'दंगल' या चित्रपटातून मिळाली. यात तिने महावीर फोगट (आमिर खान) यांची मुलगी गीता फोगटची भूमिका साकारली होती. यानंतर फातिमा 2018 मध्ये आलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मध्ये झळकली होती. गेल्या वर्षी ती 'लुडो', 'सूरज पे मंगल भारी' या चित्रपटांमध्ये दिसली होती. यावर्षी ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या अजिब दास्तां या चित्रपटातही दिसली आहे.

बातम्या आणखी आहेत...