आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामावर परतायचे आहे!:फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने मुख्यमंत्र्यांकडे मागितली काम सुरु करण्याची परवानगी, मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने मुख्यमंत्र्यांकडे अर्धवट राहिलेल्या चित्रपटांचे काम पूर्ण करण्याची संमती मागितली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 19 मार्चपासून बॉलिवूडमध्ये सर्व काम ठप्प पडले आहे. आता देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पादेखील सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अर्धवट राहिलेल्या चित्रपटांचे काम पूर्ण करण्यासाठी परवानगी मागितली आहे. 

लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबले आहे. परिणामी कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या नुकसानातून बाहेर येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी विनंती द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने केली आहे.

चित्रपटसृष्टीतील अनेक प्रोजेक्ट्स अर्धवट पडले आहेत. त्यांचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम बाकी आहेत. त्यामध्ये एडिटिंग, साऊंड रेकॉर्डिंग, म्युझिक रेकॉर्डिंगसारखी तांत्रिक कामे बाकी आहेत. जर आम्हाला परवानगी मिळाली तर आम्ही ही सर्व कामे बंद स्टुडिओमध्ये कमीतकमी वर्क फोर्ससह करू. ज्यांनी बराच पैसा गुंतवला आहे, अशा प्रोड्युर्ससाठी ही एक दिलासादायक बाब ठरेल. लॉकडाऊन संपल्यानंतर हे प्रोजेक्ट्स रिलीजसाठी तयार असतील, अशा आशयाचा मजकुर या पत्रामध्ये लिहिला आहे.  

अशोक पंडित, बी.एन. तिवारी, अशोक दुबे आणि गंगेश्वरलाल श्रीवास्तव यांनी त्यांच्या 5 लाख सदस्यांच्या वतीने सीएम उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिले आहे. या सर्वांनी लवकरात लवकर या विषयावर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

फेडरेशनने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली

  • फेडरेशनने तयार केलेल्या गाईड लाईननुसार टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंग जूनअखेर सुरू होणार आहे.
  • शूटिंग सेटवर सर्व कामगार तंत्रज्ञांनी मास्क आणि सॅनिटायर्सचा वापर केला नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी एक इंस्पेक्टर हजर राहील.
  • सेटवर कोरोना विषाणूमुळे कोणताही कामगाराला काही झाले तर अशा परिस्थितीत निर्मात्याला त्याच्या कुटुंबाला 50 लाखांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागेल.
  • शूटिंग सेटवर 100 हून अधिक कामगार काम करत असल्यास, निर्मात्यांना त्यांना दोन युनिट्समध्ये विभाजित करावे लागेल.
  • पहिले 50% कामगार एका युनिटमध्ये काम करतील, उर्वरित 50% कामगार दुसर्‍या युनिटमध्ये काम करतील, हे युनिटनुसार काम करेल, जेणेकरून कोणताही कामगार बेरोजगार राहणार नाही.
  • प्रत्येक सेटवर आपात्कालिन स्थितीसाठी रुग्णवाहिका उभी राहील.
बातम्या आणखी आहेत...