आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि कोरोना प्रकरणाची वाढती संख्या पाहता राज्य सरकार लवकरच लॉकडाउन लागू करू शकते. दरम्यान, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसी) ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. या पत्रात एफडब्ल्यूआयसीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात लॉकडाउन न लावण्याची विनंती केली आहे. एफडब्ल्यूआयसीचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी या पत्राची प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे.
पत्र शेअर करताना अशोक पंडित यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एफडब्ल्यूईसी मुंबई तुम्हाला पुन्हा महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन न लावण्याची विनंती करता आहे. कारण यामुळे इंडस्ट्रीत भीती निर्माण होईल. ही इंडस्ट्री आधीच वाईट अवस्थेतून जात आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला त्यांच्या एसओपी आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार संपूर्ण सावधगिरी बाळगत असल्याचे आश्वासन देतो." गेल्या एका वर्षात कोरोनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीवर वाईट परिणाम झाला आहे.
गेल्या काही दिवसांत बर्याच सेलिब्रिटींना झाली कोरोनाची लागण
बॉलिवूडमध्ये कोरोनाचा धोका सतत वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. अलीकडेच अभिनेत्री आलिया भट्ट कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ती सध्या होम क्वारंटाइनमध्ये असून उपचार घेत आहे. आलियापूर्वी फातिमा सना शेख, बप्पी लहरी, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, संजय लीला भन्साळी आणि सतीश कौशिक यांना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने रणबीर कपूरसह अनेक सेलिब्रिटी कोरोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत 29.04 लाख केस
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने कहर केला. गेल्या 24 तासांत राज्यांत तब्बल 47,827 नवीन काेरोना रुग्ण वाढले आहेत. ही काेरोना महामारी सुरू झाल्यापासूनची उच्चांकी संख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 29 लाख 4,076 वर पाेहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही 3 लाख 89,832 वर गेली आहे. गुरुवारी 202 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या 55,379 झाली आहे. दुसरीकडे, दिवसभरात 24,126 रुग्ण बरे हाेऊन घरीही परतले. राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा आता 24 लाख 57,494 झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.62 टक्क्यांवर आले आहे. राज्याचा मृत्युदर 1.91% इतका आहे.
आजवर 2.1 कोटी चाचण्या
राज्यात आजवर 2 कोटी 1 लाख 58,719 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 14.41 टक्के जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 21 लाख 1,999 जण होम क्वॉरंटाइन, तर 19,237 जण संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.