आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर कपूरला पाहून तरुणीचा ताबा सुटला:जबरदस्तीने किस करण्याचा केला प्रयत्न, व्हिडिओ पाहून युजर्सचा संताप

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार'चे जोरदार प्रमोशन करत आहे. यासाठी तो अनेक शो आणि कार्यक्रमांना जात आहे. दरम्यान, अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला फॅन रणबीरसोबत सेल्फी घेतल्यानंतर त्याचा किस घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच युजर्सनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

महिला फॅनने रणबीरच्या गालाला केला स्पर्श
या व्हिडिओमध्ये रणबीर एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये चाहत्यांनी घेरलेला दिसत आहे. त्यानंतर एक फॅन अभिनेत्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पोहोचली. सुरुवातीला तिने रणबीरसोबत सेल्फी काढला, मात्र त्यानंतर अभिनेता निघून जाऊ लागताच तरुणीने त्याच्या गालाला स्पर्श करून त्याचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे रणबीर काहीसा अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.

व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स संतापले
व्हिडिओ समोर येताच यूजर्स या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली की, 'ती हे कसे करू शकते यावर विश्वासच बसत नाही, संमतीशिवाय एखाद्याला स्पर्श कसा करू शकते.' तर तिकडे दुसर्‍या युजरने लिहिले की, 'रणबीरऐवजी महिला स्टार असती तर काय झाले असते?'

रणबीर कपूरचे वर्कफ्रंट

रणबीर कपूर श्रद्धा कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कार'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट रोमँटिक-कॉमेडीने भरलेला आहे. या चित्रपटातून श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहेत. रणबीर कपूर प्रदीर्घ काळानंतर एका रोमान्स-कॉमेडी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...