आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू श्रीवास्तव यांना तापातून आराम:तिसऱ्या दिवशी ताप उतरला, उत्तर प्रदेश सरकारने निवासी आयुक्तांकडे देखरेखीची जबाबदारी सोपवली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा पाहायला मिळत आहे. तिसऱ्या दिवशी त्यांना तापेपासून पूर्णपणे आराम मिळाला. राजू श्रीवास्तव यांच्या देखरेखीची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारने निवासी दिल्लींच्या आयुक्तांकडे सोपवली आहे. श्रीवास्तव यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांकडून माहिती घेतली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे त्यांच्या मोठ्या भावाने सांगितले आहे.

26 दिवसांपासून कोमात

राजू श्रीवास्तव यांना कोमात जाऊ 26 दिवस झाले आहेत. यादरम्यान त्यांना एकदाही शुद्ध आली नाही. मात्र, त्यांच्या हात-पायातील हालचाली वाढल्या आहेत. त्यांचा भावाने सांगितले की, राजू श्रीवास्तव यांची रिकव्हरी खूपच संथगतीने आहे. त्यांना शुद्धीवर येण्यासाठी आणखी दिवसांचा कालावधी लागू शकतो.

राजू श्रीवास्तव यांचे चाहेत गणपती बाप्पा सोबतचे काही फोटो शेअर करत आहेत.
राजू श्रीवास्तव यांचे चाहेत गणपती बाप्पा सोबतचे काही फोटो शेअर करत आहेत.

कॉमेडियन पाल यांनी शेअर आठवणी

राजू श्रीवास्तव यांचे मित्र, नातेवाईक आणि चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. श्रीवास्तव यांचे मित्र कॉमेडियन सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत "खुद जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है" हे गाणे लावण्यात आले आहे. या व्हिडिओ राजू श्रीवास्तव अती आनंदात दिसत आहे. हा व्हिडिओ राजू पाल यांच्या ऑफिसमध्ये शूट करण्यात आला होता.

आधी आला होता ताप

10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी त्यांना ताप आला होता. 3 दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. यानंतर मात्र त्यांच्या मेंदूमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले.

मुलगी ICU मध्ये भेटली

राजू श्रीवास्तव यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी अंतरा शनिवारी आयसीयूमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेली होती. पत्नी शिखा यांनाच आयसीयूमध्ये प्रवेश दिला जात होता. श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरून काढण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे. त्यांची बीपी, हृदय, नाडीचे ठोके नॉर्मल काम करत आहेत. ताप पूर्णपणे उतरल्यानंतर व्हेंटिलेटर काढता येऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...