आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनकचा ट्रेलर रिलीज:विद्युत जामवालच्या सनकमध्ये हाय ऑक्टेन अ‍ॅक्शनचा तडका, 26/11च्या मुंबई हल्ल्याचे स्मरण करुन देतात अ‍ॅक्शन सीन

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बहुप्रतिक्षित सनकचा ट्रेलर रिलीज

जगातील मोठ्या अ‍ॅक्शन स्टारपैकी एक असलेल्या अभिनेता विद्युत जामवालच्या आगामी 'सनक- होप अंडर सीज'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट लवकरच डिज्ने + हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.

कनिष्क वर्मा दिग्दर्शित 'सनक'मध्ये विद्युत जामवालसह चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि बंगाली स्टार रुक्मिणी मैत्रा दिसणार आहे. रुक्मिणी मैत्रा या होस्टेज ड्रामाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डिज्ने+ हॉटस्टारवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

विद्युत जामवाल म्हणतो की, “सनकसोबत आम्ही दर्शकांसाठी एड्रेनालाईन अनुभव देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याद्वारे आधी करण्यात आलेल्या सर्व अ‍ॅक्शन दृश्यांपेक्षा हटके काही करणे रोमांचक होते. तुम्हाला 'सनक' अवश्य पाहायला हवी आहे आणि सोबतच प्रेमासाठी सनकी माझी भूमिका देखील."

निर्माते विपुल शाह म्हणतात की, "सनक - होप अंडर सीज' एक अ‍ॅक्शनने भरपूर असा थ्रिलरपट असून, याचे कथानक एक व्यक्ती आपल्या प्रेमासाठी काय करू शकतो याच्या आसपास फिरते आणि हाच या कथेचा मुख्य गाभा आहे. प्रेम तुम्हाला कुठे नेऊ शकते याला काही सीमा नाही. आम्हाला बंगाली सुपरस्टार रुक्मिणी मैत्राला 'सनक'च्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत सादर करताना आनंद होतो आहे."

'सनक - होप अंडर सीज' झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत असून 15 ऑक्टोबरपासून डिज्ने+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर स्ट्रीम होईल. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...