आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'फॅशन'ला झाली 12 वर्षे:'क्लायमॅक्स सीनच्या वेळी रडू लागली होती प्रियंका', अभिनेता समीर सोनीने सांगितल्या चित्रपटातील पडद्यामागच्या गोष्टी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'फॅशन’साठी प्रियंका आणि कंगनाला मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार

मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’ला आज 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. 29 ऑक्टोबर 2008 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानिमित्त अभिनेता समीर सोनीने ‘दिव्य मराठी’सोबत चर्चा केली. समीरने या चित्रपटात राहुलची भूमिका साकारली होती.

  • 'क्लायमॅक्स सीनच्या वेळी रडू लागली होती प्रियंका

मला मधुर भांडारकर यांच्या ऑफिसमधून फोन आला, नवीन फोटो काढला असेल तर पाठवून द्या. त्यांनी सांगितले, राहुल अरोराचे पात्र असे राहणार आहे. त्याचे शूटिंग 3 दिवसांत सुरू होईल. पडद्यावर गे पात्राची थट्टा केली जात होती मात्र हे खूपच गंभीर पात्र होते. त्यामुळे मी होकार दिला होता. हा त्याकाळचा खूप बोल्ड चित्रपट होता. त्यावेळी कंगना ड्रग्ज घेत असल्याचे चित्रपटामध्ये दाखवण्यात आले होते, प्रियंका आफ्रिकेनसोबत एक रात्र घालवते, इतके दाखवणेच चित्रपटात पुरेसे होते. नंतर लोकांनी माझे खूप कौतुक केले. भूमिकेसाठी भुवया सेट केल्या होत्या. मधुर भांडारकर यांचे चित्रपट वास्तववादी असतात. यामध्ये त्यांच्या दृष्टीने परिपूर्ण कार्य करावे लागते. हे आव्हान माझ्यासमोर होते. या पात्राला जीवंत करण्यासाठी संपूर्ण चित्रपटात डोळ्यात काजळ घातले होते. एवढेच नव्हे तर पातळ भुवयांची सेटिंगही केली गेली. किसिंग सीनसाठी थोडी अडचण झाली होती.

एक दृश्य होते, त्यात मला मा‌झ्या बॉयफ्रेंडसोबत किस करायचे होते. त्यावेळी मी अडचणीत सापडलो होतो. जीवनात कधी कोणत्याही माणसाला किस केले नाही. आता सीन कसा करावा असा प्रश्न पडला हाेता. नंतर पात्राचा विचार केला अाणि कसं तरी तयार झालो. चांगलाच करु असा विचार केला. आम्ही दोघे गाडीत बसलो होतो. चित्रपटात जो मुलगा माझा ब्वॉयफ्रेंड बनला होता ताे 20-21 वर्षाचा मुलगा होता. आम्ही दोघे गाडीत बसलो हाेतो, त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता.. मी त्याला विचारले काय झाले ? म्हणाला, भैया भिती वाटत आहे. तो खूपच घाबरला होता.

  • प्रियंकासोबत धमाल करायचो

प्रियंका चोप्रासोबत छान काम केले. त्यावेळी प्रियांकाचे इतके मोठे नाव नव्हते. क्लायमॅक्स सीनमध्ये जेव्हा प्रियंका रॅम्पवर जाते आणि तिला कंगनाच्या पात्राने आत्महत्या केल्याचे समजते. तेव्हा रडणार होती, असे दृश्य हाेते. त्यानंतर माझी एन्ट्री हाेणार होती.या दृश्य कुणालाही आधी माहित नव्हते. मला प्रियंकाला आधार द्यायचा सांगितले होते. मात्र सेटवर जाताच प्रियंका रडायला लागली आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवले. त्यानंतर मधुरचा पाठीमागून आवाज आला, शूट चांगला झाला, कॅमेरा फिरवा, असे म्हणाला.

खास बाबी

  • प्रियंकाने चित्रपटात सुपरमॉडेलची भूमिका केली होती. तिने चित्रपटात 137 पोशाख घातले होते.
  • चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन मधुर आधी पॅरिसमध्ये आयफेल टाॅवरच्या खाली शूट करू पाहत होते मात्र तसे होऊ शकले नाही.
  • चित्रपटासाठी प्रियंकाला उत्कृष्ट अभिनेत्री आणि कंगनाला उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.