आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे दिवंगत दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोप्रा, ज्यांना सर्वजण बी.आर. चोप्रा या नावाने ओळखतात त्यांचे घर नुकतेच सुमारे 183 कोटी रुपयांना विकले गेले आहे. रिपोर्ट्सनुसार, हा बंगला एक प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर रहेजा कॉर्प यांनी खरेदी केला आहे. बीआर हाऊस मुंबईतील जुहू परिसरात तब्बल 25,000 स्क्वेअर फूट म्हणजेच जवळजवळ एक एकरमध्ये पसरले आहे.
डेव्हलपरने गेल्या महिन्यात केली होती बीआर हाऊसची नोंदणी
वृत्तानुसार, बीआर हाऊसचा सौदा गेल्या महिन्यात झाला होता. त्याचवेळी डेव्हलपरने घराच्या नोंदणीसाठी सुमारे 11 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले. रियल्टी डेव्हलपर या जमिनीवर रेसिडेन्शिअल एंटिटी कॉर्प होम्सच्या माध्यमातून प्रीमियम प्रकल्प उभारण्याची योजना आखत असल्याचे सांगितले जाते.
बीआर चोप्रा यांना महाभारतातून मिळाली खरी ओळख
बीआर चोप्रा यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांचा जन्म 22 एप्रिल 1914 रोजी झाला होता. लाहोर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते 1947 मध्ये पहिल्यांदा मुंबईला गेले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले, मात्र 1988 मध्ये त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती महाभारत या पौराणिक मालिकेने. ही मालिका खूप गाजली. बीआर चोप्रा यांचे 5 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत निधन झाले. बीआर चोप्रा 'वक्त', 'नया दौर', 'द बर्निंग ट्रेन', 'निकाह' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.