आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किस्सा:दिग्दर्शक सुभाष घई यांनी सांगितले- दिलीप कुमार यांनी त्यांचा मित्र बाबूराव यांच्यासाठी फ्रीमध्ये केली होती जाहिरात, संपूर्ण करिअरमध्ये केलेली हीच एकमेव जाहिरात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुभाष घई यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आता या जगात नाहीत. मात्र त्यांच्या आठवणी कायम राहतील. अलीकडेच ‘कर्मा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांनी दिलीप कुमार यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. सुभाष घई यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना सांगितले की, दिलीप कुमार यांनी आयुष्यात कधीही कोणत्याही जाहिरातीचे समर्थन केले नाही. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत फक्त एक जाहिरात केली, ज्यासाठी त्यांनी पैसेही घेतले नव्हते.

सुभाष घई यांनी दिलीप कुमार यांनी केलेल्या एकमेव जाहिरातीचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, "दिलीप कुमार नेहमीच आपल्या मित्रांच्या पाठीशी उभे राहिले... त्यांनी संपूर्ण कारकीर्दीत कोणतीही जाहिरात केली नाही. मात्र, फिल्म इंडिया मासिकाचे संपादक बाबूराव पटेल हे अपवाद होते. दिलीप कुमार यांनी बाबूराव यांच्या एका उत्पादनाची केवळ जाहिरातच केली नाही तर त्यासाठी त्यांनी आपल्या मित्राकडून एक पैसाही घेतला नाही,' अशा आशयाची पोस्ट सुभाष घई यांनी शेअर केली आहे.

दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी निधन झाले
दिलीप कुमार यांचे प्रदीर्घ आजाराने वयाच्या 98 व्या वर्षी 7 जुलै रोजी निधन झाले. दिलीप कुमार यांना मुंबईतील जुहू कब्रस्थानात संपूर्ण राजकीय सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला होता. दिलीप कुमार यांनी सहा दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 65 हून अधिक चित्रपट केले. 'देवदास' (1955), 'नया दिसला. 1986). 'नया दौर' (1957), 'मुगल-ए-आजम' (1960), 'गंगा जमुना' (1961), 'क्रांती' (1981) आणि 'कर्मा' (1986) या गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांचा अखेरचा चित्रपट 'किला' हा होता, जो 1998 मध्ये रिलीज झाला होता.

बातम्या आणखी आहेत...