आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेना संसर्गाची लाट पुन्हा एकदा आली आहे. त्यामुळे चित्रपट आणि बॉक्स ऑफिसच्या शेड्यूलवर अनेक प्रकारचे बदल झाले आहेत. कोणी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत तर कोणी परदेशातील शूटिंग शेड्यूल रद्द करत आहेत. दुसरीकडे देशात ज्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, त्याच्यावर काही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. विशेष म्हणजे ज्या चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक पॉझिटिव्ह येऊनही त्यांच्या शूटिंगवर काही परिणाम झाला नाही. वाचा रिपोर्ट
या चित्रपटाचे शूटिंग नियमित सुरू आहे
1. बच्चन पांडे : अक्षय कुमार अभिनीत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. शूटिंग राजस्थान आणि मुंबईत पूर्ण झाले.
2. पठान : या चित्रपटावर दुबई टेक्निकल काम करण्यात आले. मात्र तेथे जाण्यासाठी मुहूर्त निघेना. भारतातच यशराज स्टुडिओमध्ये याचे शूटिंग सुरू आहे.
3. जुग जुग जियो: वरुण धवन, नीतू कपूर आणि मनीष पॉल यांना कोरोना झाला. मात्र चंदीगडमध्ये उरलेले शूटिंग आरामात पूर्ण झाले.
4. एक व्हिलन 2 : याचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. जॉन अब्राहम, दिशा पाटणी, तारा सुतारिया आणि आदित्य रॉय कपूर आपले शूटिंग करताहेत.
5. रामसेतू : अक्षय कुमार अभिनीत या चित्रपटाचा मुहूर्त शॉट नुकताच अयोध्येत शूट झाला. याची शूटिंग मुंबईत एप्रिलपासून सुरू होणार आहे.
6. भेिडया : वरुण धवनने नुकतेच याचे शूटिंग उत्तर भारतात सुरू केले. त्याच्यासोबत अभिषेक बॅनर्जीदेखील दिसले.
7. अनेक: आयुष्मान खुराणाने याचे शूटिंग नुकतेच दिल्लीत पूर्ण केले. दिल्लीच्या आधी अरुणाचल प्रदेश आणि अासाममध्ये याचे शूटिंग झाले आहे.
8. गंगूबाई: पूर्ण शूटिंग फिल्मसिटीत झाले. दरम्यान संजय लीला भन्साळी यांना कोरोना झाला तेव्हा त्यांचे काम सहायक दिग्दर्शकाने सांभाळले.
विदेशात शूटिंग ठरलेल्या चित्रपटात झाला बदल
1. ओम: आदित्य रॉय कपूर अभिनीत या अॅक्शन चित्रपटाचे तुर्कीमध्ये शूट होणार होते. मात्र त्याच्या शेड्यूलवर तलवार लटकली आहे.
2. टायगर 3: सलमान खानच्या "टायगर ३’ चे शूटिंगदेखील पुढे ढकलण्यात आले आहे. सध्या ते मुंबईतच सुरू आहे.
3. धाकड : कंगना रनौत अभिनीत या अॅक्शन चित्रपटाचे शेड्यूल थायलँडमध्ये शूट होणार होते. मात्र कोरोनामुळे ते अधांतरीच लटकले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.