आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीक्रेट वेडिंग:दिग्दर्शक अली अब्बास जफरने थाटले गुपचुप लग्न, सोशल मीडियावर शेअर केला फोटो पण पत्नीची ओळख लपवून ठेवली

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या फोटोत अली पत्नीचा हात पकडून दिसतोय.

अभिनेता सलमान खान स्टारर भारत आणि एक था टायगर या चित्रपटांचा दिग्दर्शक अली अब्बास जफर अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अलीने लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितले. पण फोटो शेअर करताना अलीने पत्नीचा चेहरा आणि तिची ओळख मात्र लपवून ठेवली.

या फोटोत अली पत्नीचा हात पकडून दिसतोय. पण तिचा चेहरा दिसत नाहीये. कॅप्शनमध्ये अलीने रेड हार्टसह लिहिले, 'बिस्मिल्लाह'

सीक्रेट समोर आल्यानंतर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

अलीच्या या सीक्रेट वेडिंगचा खुलासा झाल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कतरिना कैफ, इसाबेल कैफ, अंगद बेदीसह अनेक कलाकारांनी त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अलीने सलमानच्या सुल्तान, टायगर जिंदा है आणि भारत या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या वर्षी त्याने ईशान खट्टर आणि अनन्या पांडे स्टारर ‘खाली-पिली’ या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.

अली लवकरच डिजिटल पदार्पण करणार आहे. त्याची वेब सीरिज 'तांडव' अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहेत. सैफ अली खान, डिंपल कपाडिया आणि सुनील ग्रोव्हर यात दिसणार आहेत. ही वेब सीरिज येत्या 15 जानेवारीला रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...