आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज हिंदी सिनेसृष्टीतील आयकॉनिक 'लगान’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास दिनानिमित्त दिव्य मराठीने 'लगान’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि मुख्य अभिनेता आमिर खानसोबत चर्चा केली...
'लगान'चे दिग्दर्शक आणि आमिरचे मित्र आशुतोष गोवारीकर सांगतात, हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. कारण, 'लगान’ बनला नसता तर एक दिग्दर्शक म्हणून माझे करिअर सुरू झाले नसते. माझे आधीचे दोन चित्रपट चालले नव्हते. िदग्दर्शनाऐवजी मी अभिनयावर फोकस केला होता. मात्र समाधानी नव्हतो. अशा परिस्थिती एका अशा चित्रपटाचे दिग्दर्शन करणे ज्याची निर्मिती आमिर खान स्वत: करणार होते. ते अद्भुत होते. या चित्रपटाने माझे जीवन बदलले.
कथेनुसार कलाकारांची निवड करणे मोठे आव्हान होते.
'लगान’ची स्क्रिप्ट वाचली तेव्हाच काहीतरी अद्भुत बनू शकते, याची जाणीव झाली होती. हा एक ऐतिहासिक सिनेमा होता. खेळही दाखवायचा होता, प्रेम, संस्कृतीही दाखवायची होती. मी जेव्हा याचा स्क्रीन लिहाला सुरुवात केली तेव्हा हा एक शानदार चित्रपट बनू शकतो याची जाणीव झाली. जसा-जसा काळ पुढे सरकत गेला तसतसा मला विश्वास येत गेला. कथेनुसार कलाकारांची निवड करणे खूपच अवघड काम होते.
एका वर्षानंतर आमिरने होकार दिला होता
हा चित्रपट पूर्णपणे क्रिकेटवर आधारित होता. आमिर खान मुख्य भूमिका साकारण्यास घाबरत होता. कारण 'लगान’च्या आधी क्रिकेटवर आधारित (अव्वल नंबर) त्यांनी केला होता. तो चालला नव्हता. शिवाय माझ्यासोबत केलेला आमिरचा 'बाजी’देखील फ्लॉप झाला होता. त्यामुळे यासाठी आमिर नकार देईलच याची मला कल्पना होती. झालेही तसेच. पण मला आमिरच हीरो म्हणून हवा होता. त्यामुळे मी कथेत बदल केला.
शाहरुखला झाली होती विचारणा
आमिरने जेव्हा नकार दिला तेव्हा मी दुसऱ्या अभिनेत्याच्या शोधात लागलो. तेव्हा मी शाहरुखला विचारणा केली होती. त्यालाही 'लगान’ची स्क्रिप्ट आवडली होती मात्र तोे तयार झाला नाही.
‘शूटिंगदरम्यान मी सगळ्यांना विचारत होतो, आम्ही काही चूक केली का?’
या चित्रपटाविषयी आमिर खान सांगतो, 'हा चित्रपट प्रदर्शित होऊन 20 वर्षे झाली आहेत. पण आजही लोकांना हा चित्रपट आवडतो. नासिर साहेब मला म्हणत असत, काही चित्रत्रपट खूपच चांगले बनतात. ते तुम्ही बनवत नाहीत तर त्या स्वत: बनतात. लगान मला अशाच प्रकारे बनलेला चित्रपट वाटतो. तो त्या काळात बनला. आता आम्ही पुन्हा तसाच बनवण्याचा प्रयत्न केला तरी तो इतका परफेक्ट बनणार नाही. या चित्रपटाच्या खूप आठवणी आहेत. मात्र एक विशेष आठवण म्हणजे ती माझी एक्स वाइफ रिनाशी जोडलेली आहे. एकदा मी तिला या चित्रपटाची निर्मिती करण्याचे म्हटले होते. तेव्हा मला चित्रपट निर्मितीची फारसी माहिती नाही, असे रिना म्हणाली होती. तिचे म्हणणेदेखील बरोबर होते. त्यानंतर तू वेळ घेऊन समजून घेण्याचा मी तिला सल्ला दिला होता. त्यानंतर रिना सुभाष घई आणि काही दिग्दर्शकांना भेटली. तिने तांत्रिक गोष्टी समजून घेतल्या. शिकल्यानंतर मलाच रागवत असे.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.