आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुःखद:प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन, छोटीसी बात, रजनीगंधा आणि चमेली की शादी यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे केले दिग्दर्शन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बासू चटर्जी यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता सांताक्रूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले गेले.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन एखाद्या आजारामुळे झाले की त्यांना कोरोनाची लागण झाली होती, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. बासू यांच्या निधनाची बातमी IFTDA चे अशोक पंडित यांनी ट्विटवर शेअर केली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता सांताक्रूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले गेले.  

बासू चटर्जी यांचा जन्म 30 जानेवारी 1930 रोजी अजमेर येथे झाला होता. छोटीसी बात, रजनीगंधा, बातों बातों मे, एक रुका हुआ फैसला, चमेली की शादी, खट्टा मिठ्ठा, प्रियतमा, चक्रव्यूह, जीना यहाँ, अपने पराये हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. याशिवाय त्यांनी बंगाली चित्रपटही दिग्दर्शित केले होते. दुरदर्शनवरील गाजलेल्या मालिका ब्योमकेश बक्शी आणि रजनी यांच्याही दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली होती. त्यांची कन्या रुपाली गुहा यासुद्धा प्रसिद्ध दिग्दर्शिका आहेत. 

चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार आणि 1992 मध्ये 'दुर्गा'साठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांना आयफा जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. 1969 ते 2011 पर्यंत बासूदा चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. 

0