आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:फिल्ममेकर हंसल मेहता यांचे वडील दीपक सुबोध मेहता यांचे निधन, दिग्दर्शकाने स्वत: पोस्ट शेअर करत दिली माहिती

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हंसल मेहता यांनी वडिलांच्या मृत्यूचे कारण सांगितले नाही

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक हंसल मेहता यांचे वडील दीपक सुबोध मेहता यांचे निधन झाले आहे. स्वतः हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये हंसल यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. यासह, त्यांनी आपल्या वडिलांसाठी एक हृदयस्पर्शी नोट देखील लिहिली आहे आणि आपल्या वडिलांना जगातील 'मोस्ट हँडसम मॅन' असे म्हटले आहे.

मला वाटले होते की, ते माझ्यापेक्षा जास्त काळ जगतील
दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "मला नेहमी वाटायचं की ते माझ्यापेक्षा जास्त काळ जगतील. पण, मी चुकीचा होतो. मी तुम्हाला त्या जगात भेटेल बाबा... जगातील सर्वात
देखणा माणूस. निस्वार्थी प्रेमाबद्दल तुमचे आभार. माझे हीरो," अशा शब्दांत हसंल मेहता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हंसल मेहता यांनी वडिलांच्या मृत्यूचे कारण सांगितले नाही
हंसल मेहता यांनी आपल्या पोस्टमध्ये वडिलांच्या मृत्यूमागील कारण सांगितलेले नाही. हंसल मेहता यांच्या या पोस्टवर फरहान अख्तर, पूजा भट्ट, निखिल आडवाणी, रीमा कागती, आहाना कुमरा,
अतुल कसबेकर, विशाल दादलानी आणि गुनीत मोंगासह अनेक सेलेब्रिटींनी कमेंट करत त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...