आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणातील आरोपांचा परिणाम:रिया चक्रवर्तीच्या फिल्मी करिअरला बसला फटका, हातून निसटला लोम हर्षचा चित्रपट

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
 • अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि माजी मॅनेजर श्रुती मोदी, सॅम्युएल मिरांडा यांच्याविरूद्ध पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीवर फसवणूक आणि सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. यामुळे रिया संशयाच्या भोव-यात अडकली आहे. याचा फटका तिच्या करिअरला बसलेला दिसतोय. कारण तिच्या हातून दिग्दर्शक लोम हर्ष यांचा चित्रपट निसटला आहे. रियाला चित्रपटात कास्ट करुन सुशांतच्या चाहत्यांच्या भावना दुखवायच्या नाहीत, असे लोम हर्ष यांनी म्हटले आहे.

 • खराब प्रतिमेमुळे चित्रपटात न घेण्याचा निर्णय घेतला

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक लोम हर्ष यांनी सांगितले की, "हा माझा दुसरा चित्रपट असून आम्ही यात रिया चक्रवर्तीला घेण्याचा निर्णय घेतला होता. 2018 पासून आम्ही या चित्रपटाची तयारी करत होतो. यावर्षी चित्रीकरणालादेखील सुरुवात होणार होती. मात्र कोरोनामुळे चित्रीकरण सुरु होऊ शकले नाही. अद्याप याचे शीर्षक ठरलेले नाही, पण मुख्य अभिनेत्रींपैकी रिया एक होती. मात्र आता कास्टिंग टीम आणि निर्मात्यांनी रियाचा विचार चित्रपटासाठी केला होता. पण सुशांतचा मृत्यू आणि सद्य परिस्थिती लक्षात घेता आम्ही आता रियाला चित्रपटात न घेण्याचा निर्णय घेतला आहे."

या निर्णयाबद्दल ते पुढे म्हणाले, 'सुशांतच्या मृत्यू प्रकरणी रियावर अनेक आरोप आहेत. आम्हाला सुशांतच्या चाहत्यांच्या भावना दुखवायच्या नाहीत. जनतेच्या भावनांचा आम्ही आदर करतो. त्यामुळे रियाला चित्रपटात भूमिका देणार नाही.'

सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी आपल्या एफआयआरमध्ये रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर पुढील सात आरोप केले आहेत-

 • 2019 पूर्वीपर्यंत सुशांतला कोणताही मानसिक आजार नव्हता. रियाच्या संपर्कात आल्यावर अचानक मानसिक आजार कसा झाला?
 • जर तो उपचार घेत असेल तर मग आमच्याकडून लेखी किंवा तोंडी मान्यता का घेतली गेली नाही, जी आवश्यक असते?
 • सुशांतवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी कोणती औषधे दिली होती, ते देखील या कटात सामील आहेत का?
 • सुशांतची मानसिक स्थिती गंभीर असताना रियाने त्याला योग्य वागणूक का दिली नाही, ती त्याचे मेडिकल कागदपत्रं आपल्यासोबत का घेऊन गेली?
 • सुशांतच्या बँक खात्यात 17 कोटी रुपये होते, त्यापैकी एका वर्षामध्ये सुमारे 15 कोटी रुपये काढण्यात आले, हे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले?
 • सुशांतने बॉलिवूडमध्ये नाव कमावले होते. मग अचानक असे काय झाले की रियाच्या येणा-यानंतर त्याला चित्रपट मिळणे बंद झाले?
 • सुशांत त्याचा मित्र महेशसोबत मिळून केरळमध्ये ऑर्गेनिक शेतीसाठी जमीन पाहात होता, तेव्हा रियाने त्याला ब्लॅकमेल केले?

'रियाने सुशांतवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले होते'

सुशांतची मोठी बहीण मीतू सिंहने पाटणा पोलिसांना सांगितल्यानुसार, रियाने सुशांतला पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात ठेवले होते. सुशांतला भूतांच्या गोष्टी सांगून तिने त्याच्या मनात भीती निर्माण केली आणि त्याला घर बदलवण्यास भाग पाडले. तिने सुशांतचा स्टाफही बदलून टाकला होता, चौकशीत पुढे आले आहे. रिपोर्ट्सनुसार, सुशांतने 2015 मध्ये मुंबईत 20 कोटींचे पेंट पेंटहाउस खरेदी केले होते. मात्र, तरीही तो भाड्याने राहात होता. ज्या घरात त्याने आत्महत्या केली, ते भाड्याचे घर होते.

सुशांतसोबत भेटूही देत नव्हती रिया

मीतू सिंहने पोलिसांना सांगितले, 'मी जेव्हाही सुशांतला भेटायला त्याच्या वांद्र्यातील घरी जायचे, तेव्हा मला इमारती खाली तासन्तास उभे राहावे लागायचे. रिया सुशांतला मला भेटू देत नव्हती. सुशांत घरी नाही, असे कारण सांगितले जायचे. किंवा जोपर्यंत रिया घरी पोहोचत नाही, तोपर्यंत घराबाहेर उभे राहावे लागायचे, असा खुलासा मीतूने केला आहे.

मीतूच्या म्हणण्यानुसार, रियाला सुशांतच्या बहिणींनी त्याच्या घरात राहिलेले कधीच आवडले नाही... ती सुशांतबरोबर वारंवार भांडत असे. पण रियाची आई संध्या चक्रवर्ती कायम त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहात असे. यामुळे सुशांत खूप त्रस्त झाला होता. पण रिया आणि तिच्या कुटुंबाचा त्यांच्यावर खूप दबाव होता. रिया कायम त्याला ब्लॅकमेल करुन बदनाम करण्याची धमकी देत होती.

बातम्या आणखी आहेत...