आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:चित्रपट निर्माते लव रंजन 20 फेब्रुवारीला गर्लफ्रेंडसोबत थाटणार लग्न, वधूचे नाव आणि फोटो आला समोर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपल मनीष मल्होत्राचा डिझायनर ड्रेस परिधान करणार

फिल्ममेकर लव रंजन 20 फेब्रुवारी रोजी आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करत आहेत. मात्र, लव यांच्या भावी पत्नीविषयी कुठलीही माहिती समोर आली नव्हती. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या वधूचे नाव अलिशा वैद आहे.

कपल मनीष मल्होत्राचा डिझायनर ड्रेस परिधान करणार
लव यांचे लग्न अलिशा वैदसोबत होणार आहे. अलिशा आणि लव दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकले. दोघांचेही कलेवर प्रचंड प्रेम होते. यामुळेच हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या लग्नाचे फंक्शन्स सुरू झाले आहेत. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लग्नात हे जोडपे बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केलेले ड्रेस परिधान करणार आहेत.

लव रंजन आणि अलिशा वैद.
लव रंजन आणि अलिशा वैद.

लव रंजन यांचे वर्कफ्रंट
लव सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील यात दिसणार आहेत. बोनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग लव लग्नानंतर दिल्लीत सुरु करणार आहेत. यानंतर ते त्यांच्या चित्रपटाच्या अंतिम शेड्यूलसाठी स्पेनला जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...