आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक लव रंजन यांनी त्यांची मैत्रीण अलिशा वैदसोबत लग्न केले आहे. लव रंजन यांनी रविवारी (20 फेब्रुवारी) आग्रा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अलिशासोबत लग्नगाठ बांधली. हे पॉश हॉटेल ताजमहालजवळ आहे. लव-अलिशाच्या या लग्नाला त्यांच्या कुटुंबातील सदस्य, जवळच्या मित्रांसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
कार्तिकसह या सेलेब्सनी लग्नाला हजेरी लावली होती
रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, चित्रपट दिग्दर्शक दिनेश विजन, भूषण कुमार, प्रीतम, रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी, कार्तिक आर्यन, सनी सिंग आणि नुसरत भरुचासह अनेक सेलेब्स लव-अलिशाच्या लग्नात सहभागी झाले होते. लग्नानंतर संध्याकाळी हॉटेलमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शनही आयोजित करण्यात आले होते.
या जोडप्याने मनीष-सब्यसाचीचा ड्रेस परिधान केला होता
लग्नासाठी शनिवारपासून हॉटेलमध्ये पाहुणे येण्यास सुरुवात झाली होती. लग्नाच्या दोन दिवस आधी या कपलचे प्री वेडिंग फंक्शन सुरु झाले होते. हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभात दोघांनी धमाल केली. वृत्तानुसार, या जोडप्याने लग्नात बॉलिवूड फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेले कपडे परिधान केले होते.
लव रंजन यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, "लव आणि अलिशा यांना त्यांचे लग्न अत्यंत खासगी आणि लाइमलाइटपासून दूर ठेवायचे होते. लव त्यांच्या पर्सनल स्पेसचा खूप विचार करतात. यामुळेच त्यांनी त्यांच्या कामाव्यतिरिक्त खासगी आयुष्याबद्दल एक शब्दही कधी मीडियासमोर बोलला नाही."
जानेवारीत होणार होते लव-अलिशाचे लग्न
लव आणि अलीशा जानेवारीत लग्नबंधनात अडकणार होते. पण कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेमुळे या जोडप्याने त्यांच्या लग्नाची तारीख पुढे वाढवली आणि फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता परिस्थिती बरी झाल्यावर त्यांनी लग्न जास्त लांबणीवर न टाकता 20 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली. लव आणि अलिशा दोघेही कॉलेजमध्ये एकत्र होते. दोघांचेही कलेवर प्रचंड प्रेम होते. यामुळेच हे दोघे एकमेकांच्या जवळ आले.
लव रंजन यांचे आगामी प्रकल्प
लव सध्या त्यांच्या आगामी अनटाइटल्ड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील यात दिसणार आहेत. बोनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग लव लग्नानंतर दिल्लीत सुरु करणार आहेत. यानंतर ते त्यांच्या चित्रपटाच्या अंतिम शेड्यूलसाठी स्पेनला जाणार आहेत. लव रंजन हे 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'प्यार का पंचनामा' सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखले जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.